OTT Trending Movie: ओटीटीवर सस्पेन्स, क्राइम थ्रिलर चित्रपटांची प्रेक्षकांमध्ये खूप क्रेझ आहे. काही दमदार चित्रपटांच्या कथा, त्याचे सस्पेन्स तुम्हाला शेवटपर्यंत सिनेमा पाहायला भाग पाडतात. असाच एक दमदार क्राइम, सस्पेन्स-थ्रिलर सिनेमा अलिकडेच प्रदर्शित रिलीज झाला होता.त्याची तुलना ब्लॉकबस्टर 'दृश्यम'शी केली जात आहे.२ तास ८ मिनिटांच्या या चित्रपटाला ओटीटीप्रेमींची पसंती मिळत असून हा चित्रपट ओटीटीवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होताना दिसतोय.
विशेष म्हणजे ६६ वर्षीय अभिनेत्री आणि ६२ वर्षीय अभिनेत्याने हा संपूर्ण सिनेमा आपल्या खांद्यावर पेलला आहे.हा चित्रपट मध्य प्रदेशातील शिवपुरी तुरुंगातील शंभूनाथ मिश्रा (संजय मिश्रा) या एका साध्या हवालदाराच्या आयुष्यावर बेतलेला आहे. एकटेपणा आणि आर्थिक अडचणींशी झगडत असलेल्या शंभूनाथचा मुलगा परदेशी राहतो. यादरम्यान, शंभूची भेट मंजू मिश्रासोबत होते. हे दोघे एकमेकांना लपूनछपून भेटत असतात. एका कैद्याच्या बेपत्ता होण्याच्या तपासादरम्यान, त्या दोघांमध्ये एक हळुवार नातं फुलतं. चित्रपटात प्रौढ वयामधील प्रेम दाखवण्यात आलं. त्याचबरोबर मर्डर मिस्ट्री देखील बघायला मिळते.या चित्रपटाचं नाव ‘वध २' आहे.
'वध २' मध्ये नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांची मुख्य भूमिका आहे. या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन जसपाल सिंग संधू यांनी केलं आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. मिडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटाचं बजेट १० कोटी रुपये होतं. बॉक्स ऑफिसवर सिनेमाने ३.६१ कोटी रुपये इतकं कलेक्शन केलं. मात्र, ओटीटीवर रिलीज होताचं पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होतोय.शिवाय या चित्रपटाला आयएमडीबीवर ७.४ चे रेटिंग रेटिंग मिळाले आहेत.हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.
Web Summary : Crime thriller 'Vadh 2', starring Neena Gupta and Sanjay Mishra, trends on Netflix. A retired couple faces murder mystery after a crime.
Web Summary : नीना गुप्ता और संजय मिश्रा अभिनीत क्राइम थ्रिलर 'वध 2' नेटफ्लिक्स पर ट्रेंड कर रही है। एक सेवानिवृत्त जोड़ा एक अपराध के बाद हत्या के रहस्य का सामना करता है।