Join us

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; 'या' चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 12:27 IST

नवाजुद्दीनच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच तो एका नव्या भुमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'अभ्यासू अभिनेता' अशी ओळख असलेल्या नवाजुद्दीन सिद्दीकीने आपल्या अभिनयाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. विविधांगी भूमिका साकारत त्याने स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आता नवाजुद्दीनच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच तो एका नव्या भुमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या या सिनेमाचे गोव्यात शुटिंगही सुरू आहे. 

नवाजुद्दीनने कस्टम अधिकारी कोस्टा फर्नांडिस यांच्या जीवनावर आधारित चित्रपट साइन केला आहे. डिसेंबर अखेरपर्यंत चित्रपटाची टीम गोव्यात शूटिंग करणार आहे. सेजल शाहच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या या चित्रपटाच्या शूटिंगला २६ ऑक्टोबरपासून मुंबईत सुरुवात झाली. पहिल्या शेड्यूलमध्ये नवाज आणि अभिनेत्री प्रिया बापट यांच्यासोबत काही दृश्ये शूट करण्यात आली. आता नवाजुद्दीन अ‍ॅक्शन  मोडमध्ये आहे.

  टीम गोव्यात शूटिंग करत आहे. या शेड्यूलमध्ये नवाजुद्दीनसोबत काही अ‍ॅक्शन सीन शूट केले जात आहेत. नवाजुद्दीन सिद्दीकीची गणना बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये केली जाते. 'ठाकरे', 'बजरंगी भाईजान', 'गॅंग्स ऑफ वासेपूर' यांसारख्या सिनेमात नवाजने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. याशिवाय नवाजुद्दीन सेक्शन 108 या चित्रपटात दिसणार आहे. दरम्यान नवाज सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.  

टॅग्स :नवाझुद्दीन सिद्दीकीबॉलिवूडसिनेमा