Join us

नवाजुद्दीन सिद्दीकी महाराष्ट्रात कसणार शेती! लवकरचं बनणार महाराष्ट्रीयन शेतकरी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 20:19 IST

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यालाही शेती आवडते उत्तर प्रदेशातील बुढाणा येथे त्याचे घर आणि शेती आहे. जेव्हा केव्हा गावी जातो, तेव्हा नवाज शेतात काम करतो. 

बॉलिवूडचे अनेक अभिनेत्यांना शेतात राबणे आवडते. अर्थात हौस म्हणून का असेना. अनेक अभिनेत्यांकडे स्वत:ची शेती आहे आणि वेळ मिळाला तसे ते शेतात काम करतात. अभिनेते धर्मेन्द्र, अभिनेता नाना पाटेकर, अमिताभ बच्चन अशी काही नावे यात घेता येतील. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यालाही शेती आवडते उत्तर प्रदेशातील बुढाणा येथे त्याचे घर आणि शेती आहे. जेव्हा केव्हा गावी जातो, तेव्हा नवाज शेतात काम करतो. पण आताश: वेळेअभावी गावी जाऊन शेतीत मन रमवणे त्याला शक्य होत नाही. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईपासून जवळ शेती घ्यावी, अशी त्याची इच्छा होती. यातही नदीकाठची सुपिक जमिन त्याला हवी होती. 

आता  नवाजची ही इच्छा लवकरचं पूर्ण होणार आहे. होय, ठाणे जिल्ह्यातील कसारा येथे नवाज शेती खरेदी करण्याच्या तयारीत आहे. मनासारखी शेती मिळाल्याने लवकरच हा खरेदी व्यवहार पूर्ण होईल, असे कळतेय. नवाजचा भाऊ शम्स सिद्दीकी याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.  एकंदर काय तर नवाज लवकरच महाराष्ट्राचा शेतकरी म्हणून ओळखला जाणार आहे. आता महाराष्ट्रीयन शेतकरी म्हणून त्याला किती यश मिळते, तेच तेवढे बघायचे आहे.

तूर्तास नवाजुद्दीन‘मन्टो’या चित्रपटात बिझी आहे.  या चित्रपटात तो प्रसिद्ध लेखक सआदत हसन मन्टो यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.  बॉलिवूडच्या तिन्ही 'खान' आणि अन्य दिग्गजांसोबत काम केल्यानंतर नवाजुद्दीन सिद्दीकी आता सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबतही दिसणार आहे. अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी  दिग्दर्शित चित्रपटातही नवाज  दिसणार आहे.

 

टॅग्स :नवाझुद्दीन सिद्दीकी