'Manto' teaser displayed, again seen in the role of Nawazuddin Siddiqui! | ‘मंटो’चा टीजर प्रदर्शित, पुन्हा हटके भूमिकेत दिसतोय नवाजुद्दीन सिद्दिकी!

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी नेहमीच त्याच्या चित्रपटांमुळे आणि त्याने साकारलेल्या भूमिकांमुळे चर्चेत असतो. लवकरच तो ‘मंटो’ या चित्रपटात बघावयास मिळणार आहे. या चित्रपटात तो प्रसिद्ध लेखक सआदत हसन मंटो यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित करण्यात आला असून, त्यामध्ये नवाजचा दमदार अभिनय चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण करणारा आहे. टीजर बघून हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहात आकर्षित करेल असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. मात्र अद्यापपर्यंत ट्रेलर समोर आला नसल्याने तो बघण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. 

या चित्रपटात नवाजसोबत रसिका दुग्गल मुख्य भूमिकेत बघावयास मिळणार आहे. रसिका या चित्रपटात मंटोच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. चित्रपटात नवाज अशा लेखकाची भूमिका साकारत आहे, जे एकप्रकारचे विद्रोही आहेत. तो न्यायालयात आपल्या पुस्तकाविरोधात दाखल करण्यात आलेला खटला लढताना दिसतो. त्याचबरोबर टीजरमध्ये दाखविण्यात आलेले नवाजचे काही डायलॉग्सही तुम्हाला आवडतील. जसे एका दृश्यात तो म्हणतो की, ‘मंटो ही लिखता है जो वो देखता है.’ तर आणखी एका दृश्यात तो म्हणतो की, ‘मंटो अपनी कहानियों को आइना समझता है, जिसमें समाज अपने आप को देख सके.’दरम्यान, हा चित्रपट भारतात प्रदर्शित होण्याअगोदर १३ मे रोजी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखविण्यात येणार आहे. कान्समध्ये हा चित्रपट अन सर्टन रिगार्ड या सेक्शनमध्ये दाखविला जाईल. नंदिता दास यांच्या दिग्दर्शनात बनलेल्या या चित्रपटात परेश रावल, ऋषी कपूर, रसिका दुग्गल आणि ताहिर राज भसीन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाला एचपी स्टूडिओ, फिल्मस्टोक आणि वायकॉम १८ यांनी प्रोड्यूस केले आहे. दरम्यान, सआदत हसन मंटो एक उर्दू लेखक होते. कथा लेखक असण्याबरोबर चित्रपट आणि रेडिओसाठी ते पटकथा लिहायचे. ते एक पत्रकारही होते. 
Web Title: 'Manto' teaser displayed, again seen in the role of Nawazuddin Siddiqui!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.