आता रजनीकांतच्या सिनेमात दिसणार नवाजुद्दीन सिद्दीकी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 08:29 AM2018-07-19T08:29:36+5:302018-07-19T08:36:50+5:30

नवाजुद्दीन सिद्दीकी आपल्या आगामी सिनेमामध्ये थलायवा रजनीकांत यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

now nawazuddin siddiqui to share screen with rajinikanth in karthik subbarajs next film | आता रजनीकांतच्या सिनेमात दिसणार नवाजुद्दीन सिद्दीकी

आता रजनीकांतच्या सिनेमात दिसणार नवाजुद्दीन सिद्दीकी

googlenewsNext

मुंबई - आपल्या दमदार अभिनयानं बॉलिवूडमध्ये ठसा उमटवणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आपल्या आगामी सिनेमामध्ये थलायवा रजनीकांत यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. बॉलिवूडच्या तिन्ही 'खान' आणि अन्य दिग्गजांसोबत काम केल्यानंतर नवाजुद्दीन सिद्दीकी आता सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत दिसणार असल्यानं प्रेक्षकांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन कार्तिक सब्बाराज करणार आहेत. तर सिनेमात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकते सिमरन असणार आहे. या सिनेमामध्ये नवाजची अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका असल्याची माहिती मिळाली आहे. 

रजनीकांत यांनी कामालादेखील सुरुवात केली असून दार्जिलिंग आणि डेहराडूनमध्ये सिनेमाचं शूटिंग सुरू आहे. तर दुसरीकडे सिमरनदेखील आता शूटिंगला सुरुवात करणार आहे. मात्र अद्यापपर्यंत नवाज क्रूसोबत जोडला गेला नसल्याची माहिती समोर आली.  दरम्यान, नवाज 1983मधील वर्ल्डकपवर बनवण्यात येणारा सिनेमा 83मध्ये दिसणार असल्याचं म्हटलं जाते आहे.  


Web Title: now nawazuddin siddiqui to share screen with rajinikanth in karthik subbarajs next film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.