Join us

सामंथा आणि नागाच्या घटस्फोटावर नागार्जुनने केला मोठा खुलासा, सांगितलं कुणाला हवा होता घटस्फोट...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 13:34 IST

नागा चैतन्यचे वडील अभिनेता नागार्जुनने (Nagarjuna) नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं की, सामंथाला घटस्फोट हवा होता.

साऊथची लोकप्रिय अभिनेत्री सामंथा रूथ प्रभूने (Samatha Ruth Prabhu) पती नागा चैतन्य (Naga Chaitanya) घटस्फोटाची घोषणा केल्यापासून ती चर्चेत आहे. दोघांनाही याची माहिती त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली होती. फॅन्ससाठी ही शॉकिंग न्यूज होती. दोघेही आता आपलं वेगळं आयुष्य जगत आहेत. नागा चैतन्यचे वडील अभिनेता नागार्जुनने (Nagarjuna) नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं की, सामंथाला घटस्फोट हवा होता आणि नागाने तो मान्य केला. नागा परिवाराची रेप्यूटेशन आणि माझ्याबाबत जरा चिंतेत होता. पण ही न्यूज आमच्यापर्यंत पोहोचली तेव्हा आमच्यासाठीही शॉकिंग होती.

इंडिया ग्लिट्जसोबत बोलताना नागार्जुन म्हणाला की, 'नागा चैतन्यने सामंथाच्या निर्णयाचा सन्मान केला. पण तो माझ्यासाठी फार चिंतेत होता. मी काय विचार करणार आणि परिवाराच्या रेप्यूटेशनचं काय होणार. दोघे फार जवळ होते. मला नाही माहीत की दोघांनी हा निर्णय का घेतला. चार वर्षाच्या लग्नात आम्ही त्यांना कधीच भांडताना पाहिलं नाही. २०२१ चं न्यू इअर सेलिब्रेशनही त्यांनी सोबत साजरं केलं. मला वाटतं त्यानंतरच दोघांमध्ये काही समस्या निर्माण झाली असेल'.

नागार्जुन आणि नागा चैतन्य यांचा 'बंगर्राजू' हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगली कमाई केली. सिनेमाचं यश मुलगा आणि वडिलाने सोबत एन्जॉय करत आहे. सिनेमाचं दिग्दर्शन कल्याण कृष्णाने केलं आहे. तसेच यात अनेक लोकप्रिय कलाकार आहेत. 

सामंथा आणि नागाने एका जॉइंट स्टेटमेंटमध्ये लिहिलं होतं की, बराच विचार केल्यानंतर मी आणि चैतन्याने पती-पत्नी म्हणून वेगळे मार्ग निवडण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही भाग्याशाली आहोत की, आमची जुनी आणि चांगली मैत्री आहे ज्याने आमचं नातं तयार झालं होतं. मला विश्वास आहे की, ही मैत्री आमच्यात नेहमी राहील. आम्ही आमच्या फॅन्स, शुभचिंतकाना आणि मीडियाला अपील करतो की, त्यांनी या कठिण काळात आम्हाला साथ द्यावी.  

टॅग्स :समांथा अक्कीनेनीघटस्फोटTollywood