Join us

Naga Chaitanya: सामंथासोबत घटस्फोटाच्या काही महिन्यातच नागा चैतन्य लग्नासाठी तयार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 17:50 IST

Naga Chaitanya : ४ वर्षाच्या संसारानंतर दोघांनी वेगळे झाल्याची घोषणा सोशल मीडियावरून केली होती. अशात आता अशी चर्चा सुरू झाली आहे ज्याने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोड्यांपैकी एक जोडी नागा चैतन्य (Naga Chaitanya) आणि सामंथा रूथ प्रभु (Samantha Ruth Prabhu) आता वेगळे होऊन बरेच महिने झाले आहेत. गेल्यावर्षी दोघांनीही वेगळे होण्याची घोषणा केली तेव्हा सगळेच हैराण झाले होते. ४ वर्षाच्या संसारानंतर दोघांनी वेगळे झाल्याची घोषणा सोशल मीडियावरून केली होती. अशात आता अशी चर्चा सुरू झाली आहे ज्याने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, घटस्फोटाच्या काही महिन्यांनंतरच साऊथचा सुपरस्टार नागा चैतन्य पुन्हा लग्न करणार आहे. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्याने आता आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र याबाबत अभिनेता किंवा त्याच्याशी संबधित सूत्रांनी काहीच अधिकृतपणे सांगितलेलं नाही. 

रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात येत आहे की, साऊथ अभिनेत्री सामंथा रूथ प्रभुला घटस्फोट दिल्यानंतर नागा फार निराश होता. दोघांसाठीही हा निर्णय सोपा नव्हता. हेच कारण आहे की आता नागा पुन्हा कोणत्या अभिनेत्रीसोबत लग्न करणार नाही. हे वाचून नागाचे फॅन्स नक्कीच हैराण होतील पण ते त्यांच्या आवडत्या स्टारसाठी आनंदीही होतील. अशात आता यावर शिक्कामोर्तब होण्याची सगळेच आतुरतेने वाट बघत आहेत.

सामंथाआधी नागा चैतन्यचं नाव अभिनेत्री श्रुति हसनसोबत जोडलं गेलं होतं. असं सांगितलं जातं की, अभिनेत्याला श्रुतिसोबत लग्न करायचं होतं. पण काही कारणांनी दोघे वेगळे झाले. त्यानंतर त्याच्या जीवनात सामंथाची एन्ट्री झाली आणि दोघांनी लग्न केलं. पण लग्नाच्या चार वर्षातच दोघे वेगळे झाले.  

टॅग्स :Tollywoodसमांथा अक्कीनेनीबॉलिवूड