Join us

'नदिया के पार'ची 'गुंजा' आठवते का? लेटेस्ट फोटो पाहून 'चंदन'ला पण बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 15:42 IST

Sadhana singh: 'नदिया के पार' या सिनेमातल्या गुंजा आणि चंदन या जोडीला विशेष लोकप्रियता मिळाली होती.

काही कलाकार असे असतात जे त्याच्या अभिनयाने एखादी भूमिका जिवंत करतात. याच भूमिका कित्येक वर्ष प्रेक्षकांच्या स्मरणातही राहतात. त्यातलीच एक भूमिका म्हणजे नदिया के पार या सिनेमातली. १९८२ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाती गुंजा ही भूमिका विशेष गाजली होती. ही भूमिका अभिनेत्री साधना सिंह हिने साकारली होती. आज या सिनेमाला प्रदर्शित होऊ बरीच वर्ष झाली. त्यामुळेही अभिनेत्री आता काय करते? कशी दिसते असे प्रश्न नेटकऱ्यांना पडतात. 

'नदिया के पार' या सिनेमातल्या गुंजा आणि चंदन या जोडीला विशेष लोकप्रियता मिळाली होती. हा चित्रपट प्रदर्शित होऊन ४१ वर्ष झाली असून यातील कलाकारांमध्ये आता कमालीचा बदल झाला आहे. विशेष म्हणजे गुंजा म्हणजेच साधना सिंहला (Sadhana singh) आता ओळखणं कठीण झालं आहे.

साधना सिंह सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असून ती कायम तिच्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असते. साधना सिंह यांच्या चेहऱ्यावर वाढत्या वयाच्या खुणा दिसत असल्या तरीदेखील त्या प्रचंड स्टायलिश राहतात.  इन्स्टाग्रामवर त्यांनी अनेक ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. दरम्यान, साधना सिंह यांनी सिनेमासह वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. अलिकडेच त्या 'गिल्टी माइंड्स' या सीरिजमध्ये त्या झळकल्या होत्या. 

टॅग्स :सेलिब्रिटीसिनेमाबॉलिवूड