Join us  

दिग्गजांचा समावेश, सस्पेन्स, थ्रिल अन बरंच काही, netflix वर यादिवशी येणार 'मर्डर मुबारक'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2024 11:17 AM

'मर्डर मुबारक' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

तुम्हाला थ्रिलर, सस्पेन्स आणि मर्डर असं काही पाहायची इच्छा असेल. तर तुमच्यासाठी एका आनंदाची बातमी आहे. असाच एक जबरदस्त सिनेमा लवकरच नेटफ्लिक्सवर  प्रदर्शित होणार आहे. 'मर्डर मुबारक' असं या सिनेमाचं नाव आहे. याचा टीझर आज प्रेक्षकांच्या भेटीला आहे. जो पाहून तुमचाही थरकाप उडेल.

विशेष म्हणजे 'मर्डर मुबारक' या सिनेमात पंकज त्रिपाठी, सारा अली खान, विजय वर्मा, करिश्मा कपूर, डिंपल कपाडिया यांसारख्या दिग्गजांचा समावेश आहे.  १ मीनिट २७ सेंकदाच्या या टीझरमध्ये "जो कत्ल करते हैं वो दिखते कैसे हैं, साउथ दिल्ली की शहजादी की तरह या चांदनी चौक के तबाह आशिक की तरह" हा पंकज त्रिपाठी यांचा हा दमदार डायलॉग ऐकू येतो.  

टीझरमध्ये पंकज त्रिपाठी एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. तर इतर पात्र ही संशयित असल्याचं दिसून येत आहे.  हा चित्रपट १५ मार्चला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. हा सिनेमा अनुजा चौहान यांच्या "क्लब यू टू डेथ" या पुस्तकावर आधिरत असल्याची माहिती आहे. तगडी स्टार कास्ट असणाऱ्या या अनोख्या आणि हटके मर्डर मिस्ट्री चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

टॅग्स :नेटफ्लिक्ससिनेमाबॉलिवूडसारा अली खानपंकज त्रिपाठीकरिश्मा कपूर