Join us

'शक्तिमान' रिटर्न्स! ६६ व्या वर्षी शक्तिमान बनले मुकेश खन्ना; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 11:33 IST

वयाच्या ६६ व्या वर्षी मुकेश खन्ना शक्तिमानच्या रुपात प्रेक्षकांसमोर आले आहेत.

अभिनेते मुकेश खन्ना (Mukesh Khanna) ज्यांना सगळे 'शक्तिमान' (Shaktimaan) नावानेच ओळखतात. 'शक्तिमान' मालिका पाहून अनेकांचं बालपण गेलं. १९ वर्षांनी ते पुन्हा त्याच गेटअपमध्ये आले आहेत. होय, शक्तिमान पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. वयाच्या ६६ व्या वर्षी मुकेश खन्ना शक्तिमानच्या रुपात प्रेक्षकांसमोर आले आहेत. मात्र त्यांना पाहून नेटकऱ्यांनी त्यांची खिल्लीच उडवली आहे. त्यांना प्रचंड ट्रोलिंगला सामोरं जावं लागत आहे.

मुकेश खन्ना यांनी दोन दिवसांपूर्वी 'शक्तिमान रिटर्न्स' ची घोषणा केली. तर आता ते त्याच गेटअपमध्ये समोर आले आहेत. त्यांनी काही वर्षांपूर्वीच 'शक्तिमान' मालिका किंवा सिनेमाच्या रुपात पुन्हा येईल असं चाहत्यांना वचन दिलं होतं. याआधी रणवीर सिंह शक्तिमानची भूमिका साकारणार अशी चर्चा होती. मात्र मुकेश खन्नांनीच त्याला विरोध केला होता. आता ते स्वत:च त्या रुपात समोर आले आहेत. मात्र त्यांना पाहून चाहत्यांनी भलत्याच कमेंट्स केल्या आहेत. वयस्कर, फुगलेलं पोट पाहून नेटकऱ्यांनी त्यांची खिल्लीच उडवली आहे.

नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

'शक्तिमान'च्या रुपात मुकेश खन्ना समोर येताच नेटकऱ्यांनी लिहिले, 'कोणीतरी माझं बालपुण परत आणा आणि याचं घेऊन जा','मी लहानपणी याला बघून खूश व्हायचो आता मला लाज वाटत आहे','याला बाहेर काढा, आमचं बालपण संपलं आणि याचं म्हातारपण अजून सुरु होत नाही','बालपणीच्या आठवणींचा नाश केला' अशा अनेक कमेंट्स यावर आल्या आहेत. 

१९९७ साली आलेली 'शक्तिमान' लहान मुलांमध्ये लोकप्रिय मालिका होती. या मालिकेची  नोंद लिम्का बुक ऑफ रिकॉर्ड्स मध्येही झाली होती. 

टॅग्स :मुकेश खन्नाटिव्ही कलाकारसोशल मीडिया