Join us
Daily Top 2Weekly Top 5

एग्स फ्रीज करण्याबाबत अभिनेत्री मृणाल ठाकूरचं मोठं वक्तव्य, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 15:55 IST

मृणाल ठाकूरनं  एग्स फ्रीज करण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. 

बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांनी टीव्हीपासून सुरुवात केली आणि बॉलिवूडमध्ये मोठे स्थान मिळवले. या यादीत अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या नावाचाही समावेश आहे. आज मृणाल ठाकूरने बॉलिवूडमध्येच नाही तर टॉलिवूडमध्येही स्वत:चे नाव कमावले आहे.  मृणाल ठाकूरने अभिनयाने सगळ्यांची मनं जिंकून घेतली. तिने आजवर अनेक सुपरहिट सिनेमांत काम करून प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं आहे. मृणाल ठाकूरनं  एग्स फ्रीज करण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. 

मृणालनं नुकतीच 'ह्युमन्स ऑफ बॉम्बे'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत मृणालनं तिच्या खासगी आयुष्याविषयी अनेक गोष्टींवर वक्तव्य केलं आहे.   एग्स फ्रीज करण्याचा विचार करत असल्याचं तिनं सांगितलं. नात्याबद्दल बोलताना ती म्हणाली, 'मला माहित आहे की ते रिलेशनशिप कठीण आहे, परंतु म्हणूनच तुम्हाला तुमच्या कामाचं स्वरूप समजणारा योग्य जोडीदार हवा आहे'. 

मृणालच्या आयुष्यातीही असा एक काळ होता, जेव्हा तिला बाहेर पडावं वाटतं नव्हतं. यावर ती म्हणाली, असे काही दिवस होते जेव्हा मला बिछान्यातून उठावं वाटतं नव्हतं. उदास वाटतं होतं. मी विचार केला की मी जर आज बाहेर पडले नाही तर कुणालाही फरक पडणार नाही.  मग मी ठरवलं आणि  इतरांसाठी नाही तर स्वतःसाठी उठले. मला वाटते की जर वाईट दिवस असतील तर चांगले दिवसही येतील'. शिवाय, मृणालनं बॉडी पॉझिटिव्हिटीबद्दलही मत मांडलं. अनेकदा बॉडी शेमिंगचा सामना करावा लागल्याचंही तिनं सांगितलं. 

मृणाल ठाकूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाले तर, मृणाल अलीकडेच विजय देवरकोंडासोबत 'द फॅमिली स्टार' चित्रपटात दिसली होती. थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर केवळ 20 दिवसांनी ओटीटीला रीलिज होणार आहे. हा चित्रपट २६ एप्रिलपासून प्राइम व्हिडिओवर प्रसारित होणार आहे.  मृणाल ठाकूरने गे २०२२ मध्ये ‘सीता रामम’ या तेलगू चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. 'सीता रामम' नंतर लोक मृणालला 'क्वीन ऑफ रोमान्स' म्हणू लागले.

टॅग्स :मृणाल ठाकूरसेलिब्रिटीबॉलिवूड