अभिनेत्री मृणाल ठाकूर आज लाखो चाहत्यांची धडकन आहे. 'सीतारामम्'मधून तिने सर्वांचं मन जिंकलं. सध्या मृणाल 'डकैत' सिनेमामुळे चर्चेत आहे. अदिवि शेषसोबत तिची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. शिवाय ती वरुण धवनसोबत आगामी 'है जवानी तो इश्क होना है' सिनेमात दिसणार आहे. त्यामुळे मृणाल सध्या बीटाऊनमध्ये सर्वात चर्चेतली अभिनेत्री आहे. मृणालची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? यावर मृणालने कोणाचं नाव घेतलं वाचा.
रणवीर अलाहाबादियाला दिलेल्या मुलाखतीत मृणाल ठाकूर म्हणाली, "तमन्ना भाटिया माझी सर्वात जवळची मैत्रीण आहे. ती खूप चांगली आहे. आजपर्यंत तिने मला नेहमी पाठिंबा दिलाय. खरं सांगायचं तर ती मला अगदी बहिणीसाखीच आहे. इतकं आमचं छान बाँडिंग तयार झालंय आणि आमचं खूप जवळचं नातं तयार झालंय. आयुष्यात एक तरी जवळची मैत्रीण असावी असं माझं ठाम मत आहे. आधी माझे विचार असे नव्हते पण आता बदलले आहेत."
ती पुढे म्हणाली, "आता मी गर्लफ्रेंडशिप खूप एन्जॉय करते. एकत्र मजामस्ती करायची, छान आयुष्य जगायचं, एकमेकांनी सांभाळून घ्यायचं पाठिंबा द्यायचा, छोट्या छोट्या गोष्टी सेलिब्रेट करायच्या. गरज लागेल तेव्हा एकमेकींच्या पाठी उभं राहायचं हे सर्वात महत्वाचं आहे. यालाच गर्लफ्रेंडशिप म्हणतात. सुख असो किंवा दु:ख कायम एकमेकींना साथ द्यायची. मी तमन्नाला मनातलं सगळं सांगते. तिच्याकडे प्रत्येक समस्येचा उपाय आहे. हैदराबादला जाताना विमानात पहिल्यांदा आम्ही भेटलो होतो. मग हळूहळू आमची मैत्री झाली. आता आम्ही मैत्रिणी नाही तर बहिणीच आहोत."
Web Summary : Mrunal Thakur considers Tamannaah Bhatia her closest friend, almost like a sister. She values their supportive bond, enjoying life's moments together and offering unwavering support through thick and thin. They first met on a flight to Hyderabad and quickly became inseparable.
Web Summary : मृणाल ठाकुर तमन्ना भाटिया को अपनी सबसे अच्छी दोस्त मानती हैं, जो लगभग एक बहन की तरह है। वह उनके सहायक बंधन को महत्व देती है, जीवन के क्षणों का एक साथ आनंद लेती है और सुख-दुख में अटूट समर्थन प्रदान करती है। वे पहली बार हैदराबाद जाने वाली फ्लाइट में मिले और जल्दी ही अटूट हो गए।