फेब्रुवारी महिना म्हणजेच प्रेमाचा महिना सुरु झाला आहे. १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे असल्याने हा महिना लव्हबर्ड्ससाठी स्पेशल असतो. मनोरंजनविश्वातही प्रेमाचे वारे वाहत आहेत. विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना महिनाअखेर लग्नबंधनात अडकणार आहेत अशी चर्चा आहे. तर दुसरीकडे धनुष आणि मृणाल ठाकुरही या महिन्यात सातफेरे घेणार असल्याची अफवा पसरली होती. अर्थात मृणालने या सगळ्या चर्चा खोट्या असल्याचं सांगितलं होतं. आता नुकतंच आगामी सिनेमाच्या प्रमोशनवेळी मृणालने धनुषसोबतच्यालग्नाच्या चर्चांवर मजेशीर भाष्य केलं.
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत मृणाल ठाकुरने लग्नाच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली. तसंच या अफवांवरुन मजेशीर टिप्पणीही केली. खऱ्या आयुष्यात मृणालवर आईवडील लग्नासाठी दबाव देतात का? यावर मृणालने हसतच एक किस्सा सांगितला. ती म्हणाली,"कालच मी वडिलांना माझ्यासाठी एक चांगला मुलगा शोधा असं सांगितलं. त्यांच्या नजरेत सध्या कोणीच नाही असं ते म्हणाले. बघा, आता मी काय करु?"
लग्न आणि नात्यांवर मृणाल म्हणाली, "आजूबाजूच्या लोकांना वाटतं किंवा आपलं वय झालंय म्हणून लग्न करु नका. जेव्हा योग्य जोडीदार मिळेल तेव्हाच लग्न करा. एक असा जोडीदार ज्याच्यावर तुम्ही पूर्णपणे विश्वास ठेवू शकता. ज्याच्यासोबत कितीही वेळ शांत बसू शकता." पुढे मृणाल गंमतीत म्हणाली, 'तसं तर माझी आजच हळद आहे आणि उद्या संगीत आहे. तुम्ही सगळे जेऊन जा.'
मृणालसोबत यावेळी सिद्धांत चतुर्वेदीही होता. त्यानेही मृणालच्या गंमतीत साथ दिली. तो म्हणाला,'१४ फेब्रुवारीला मृणालच्या घराबाहेर नवरदेवांची रांग लागेल. जर असं झालं तर मृणालच्या लग्नाच्या चर्चा खऱ्या समजणाऱ्यांसाठी हा सर्वात मोठा एप्रिल फूल असेल."
मृणाल पुढे म्हणाली,"ज्या दिवशी मी प्रेमात पडेन तेव्हा मी अख्ख्या जगाला अभिमानाने सांगेन. मला प्रेम लपवायला आवडत नाही तर अभिमानाने दाखवायला आवडतं. खरं सांगायचं तर मीही त्या दिवसाची वाट पाहत आहे."
Web Summary : Mrunal Thakur humorously addressed rumors of marrying Dhanush, stating her parents are seeking a suitable match. She emphasized marrying when the right partner arrives, someone trustworthy. Joking about her 'haldi' and 'sangeet,' she awaits true love, ready to proudly announce it.
Web Summary : मृणाल ठाकुर ने धनुष से शादी की अफवाहों पर मजाकिया अंदाज में जवाब दिया, कहा कि उनके माता-पिता उनके लिए योग्य वर ढूंढ रहे हैं। उन्होंने सही साथी मिलने पर ही शादी करने पर जोर दिया, जो भरोसेमंद हो। अपनी 'हल्दी' और 'संगीत' के बारे में मजाक करते हुए, वह सच्चे प्यार का इंतजार कर रही है, और गर्व से इसकी घोषणा करने के लिए तैयार है।