Join us

अखेर मृणाल ठाकूरने धनुषसोबतच्या डेटिंगवर सोडलं मौन; केला मोठा खुलासा, म्हणाली- "आम्ही आता..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 09:37 IST

मृणाल ठाकूर आणि धनुष एकमेकांना डेटिंग करत असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यावर मृणाल ठाकूरने मौन सोडलंय

अलीकडे अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि दाक्षिणात्य अभिनेता धनुष यांच्याबद्दल सोशल मीडियावर डेटिंगच्या चर्चा जोरात सुरू होत्या. दोघे काही कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसल्यामुळे ही चर्चा अजून वाढली. काही चाहत्यांनी तर त्यांचा फोटो आणि व्हिडिओ शेअर करून हे दोघं एकमेकांच्या प्रेमात असून लवकरच लग्न करणार, अशी अटकळ बांधायला सुरुवात केली. अखेर या चर्चांवर मृणाल ठाकूरने मौन सोडलंय आणि मोठा खुलासा केलाय.

मृणाल ठाकूरने धनुषबद्दल दिली ही प्रतिक्रिया

रिलेशनशीपच्या चर्चांवर आता मृणाल ठाकूरने स्वतः प्रतिक्रिया दिली आहे. तिने सांगितले की, धनुषसोबत तिचे फक्त चांगले मैत्रीपूर्ण संबंध आणि प्रोफेशनल नातं आहे. त्यात कुठलाही प्रेमसंबंध नाही. ती म्हणाली की, लोकांना गॉसिप करायला आवडते, पण त्यामागे काहीही सत्य नाही. मृणालने हेही सांगितले की, ती या गोष्टी फार गंभीरपणे घेत नाही, तर अशा गोष्टींना हलक्याफुलक्या पद्धतीने पाहते.

मृणाल आणि धनुष एकमेकांना डेट करत आहेत ही चर्चा सुरु झाली काही दिवसांपूर्वी. जेव्हा धनुषने मृणालच्या ‘सन ऑफ सरदार २’ या चित्रपटाच्या प्रीमिअर शोला हजेली लावली. पण मृणालने स्पष्ट केले की, तो अजय देवगणच्या निमंत्रणावर तिथे आला होता. तिने धनुषला कोणत्याही प्रकारचे निमंत्रण दिले नव्हते.  त्यामुळे त्यांच्या भेटीचा आणि या अफवांचा काहीही संबंध नाही. मृणाल आणि धनुष यांचा एकत्र काम करण्याचा अनुभव चांगला राहिल्यामुळे ते एकमेकांचा सन्मान करतात, हे तिने स्पष्ट केले. सोशल मीडियावर लोक जे पाहतात आणि त्यावरून अंदाज लावतात, ते नेहमीच खरे असते असे नाही, असंही ती म्हणाली.

या वक्तव्यामुळे मृणालने या अफवांना पूर्णविराम दिला आहे. तिने चाहत्यांना आणि माध्यमांना सांगितले की, अशा बातम्यांकडे फार लक्ष देऊ नये आणि कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याचा आदर करावा. त्यामुळे आता हे स्पष्ट झाले आहे की मृणाल आणि धनुष यांच्यात फक्त चांगली मैत्री आहे, त्यापलीकडे काही नाही.

टॅग्स :मृणाल ठाकूरधनुषबॉलिवूडलग्नरिलेशनशिप