Join us

"खूप नजर लागते..." धनुषसोबत रिलेशनशिपच्या चर्चेत मृणाल ठाकूरच्या वक्तव्यानं वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 11:19 IST

धनुष आणि मृणाल एकमेकांच्या प्रेमात असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

Mrunal Thakur Dhanush Relationship Rumors: अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिचं नाव साऊथ सुपरस्टार धनुष (Dhanush) याच्यासोबत जोडलं जात आहे. दोघंही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरात सुरू आहेत. अलिकडेच दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये धनुषने मृणालचा हात हातात धरला असून दोघांमध्ये गप्पा सुरू आहेत. या व्हिडीओनंतर दोघांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

मृणाल आणि धनुष यांचं नातं काही काळापासून सुरू असल्याचं बोललं जात आहे. मात्र, दोघांनीही यावर अधिकृतपणे काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. हे नातं त्यांनी खाजगी ठेवण्याचा निर्णय घेतल्याचंही काही रिपोर्ट्समध्ये नमूद करण्यात आलं आहे. या चर्चांच्या पार्श्वभूमीवर मृणालचं जुन्या मुलाखतीतील एक वक्तव्य पुन्हा चर्चेत आलं आहे. इन्स्टंट बॉलिवूडला दिलेल्या मुलाखतीत तिनं म्हटलं होतं, "अजूनही खूप गोष्टी करायच्या आहेत. मी ते पूर्ण केल्यावरच त्याबद्दल बोलेन. कारण मला कुणाची नजर लागून घ्यायची नाही. खूप नजर लागते".

मुलाखतीत पुढे बोलताना मृणाल म्हणाली, "काहीही बोलण्यापूर्वी विचार करायला हवा. माझं व्यक्तिमत्त्व खूप वेगळं आहे. लोक पुढच्या वर्षी येणाऱ्या चित्रपटांबद्दल बोलतात, पण मी तसं करत नाही. सगळ्यांना माहिती असतं काय येणार आहे आणि काय नाही. मी सतत त्याचा विचार करत नाही. मी खूप सकारात्मक व्यक्ती आहे".

 धनुषचे पूर्वी रजनीकांतची मुलगी ऐश्वर्याशी लग्न झाले होते. १८ वर्षे एकत्र राहिल्यानंतर त्यांनी २०२२ मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला. दोघांची पहिली भेट त्यांच्या 'कढल कोंडें' (२००३) या चित्रपटाच्या रिलीजच्या दिवशी झाली होती. कामाबद्दल बोलायचे झाले तर, धनुष आणि क्रिती सनॉनचा 'तेरे इश्क में' हा चित्रपट २८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. मृणालच्या कामाच्या बाबतीत, ती अलिकडेच अभिेता अजय देवगणसोबत 'सन ऑफ सरदार २' या चित्रपटात झळकली. 

टॅग्स :मृणाल ठाकूरधनुषरिलेशनशिप