Join us
Daily Top 2Weekly Top 5

रणवीर सिंगच्या 'धुरंधर २'ला टक्कर देतोय मराठी अभिनेत्रीचा 'हा' सिनेमा; दोन दिवसांत तब्बल १२ कोटींची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 16:45 IST

मराठी अभिनेत्रीच्या या सिनेमाने रणवीर सिंगच्या 'धुरंधर २' सारख्या मोठ्या चित्रपटाला तगडं आव्हान दिलं आहे. कोणता आहे हा सिनेमा?

साऊथ सुपरस्टार अदिवी शेष आणि अभिनेत्री मृणाल ठाकूर यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'डकैत' (Dacoit) सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने कमाईत मोठी कमाई केली असून, रणवीर सिंगच्या 'धुरंधर २' सारख्या मोठ्या चित्रपटाला तगडं आव्हान दिलं आहे'डकैत'ला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, कमाईत सुमारे ५० ते ६० टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने ७.२५ कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे. यामुळे दोन दिवसांची एकूण कमाई आता १२ कोटींच्या पार गेली आहे.

'धुरंधर २' समोर आव्हान

बॉक्स ऑफिसवर आधीच रणवीर सिंगचा 'धुरंधर २' बक्कळ कमाई करत आहे्. मात्र, 'डकैत'च्या दमदार कथानकामुळे आणि अदिवी शेष-मृणाल ठाकूर यांच्या केमिस्ट्रीमुळे प्रेक्षक या चित्रपटाला भरभरुन प्रतिसाद देत आहेत. विशेषतः चित्रपटाच्या तेलुगू आणि हिंदी आवृत्तीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट समीक्षकांच्या मते, जर 'डकैत'चा कमाईचा हा वेग कायम राहिला, तर रविवारी हा चित्रपट १० कोटींचा आकडा सहज पार करू शकतो.

'डकैत' हा एक हाय-ऑक्टेन ॲक्शन ड्रामा असून यात कपलची कथा दाखवण्यात आली आहे, जे एका मोठ्या चोरीसाठी एकत्र येतात. अदिवी शेषने पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत, तर मृणाल ठाकूरचा हटके लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. पुढील दिवसांत ''डकैत' बॉक्स ऑफिसवर किती नवनवीन विक्रम प्रस्थापित करतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. सध्या या चित्रपटाला मिळत असलेला 'वर्ड ऑफ माऊथ' पाहता, हा चित्रपट भरघोस कमाई करेल, असं बोललं जातंय.

English
हिंदी सारांश
Web Title : Mrunal Thakur's 'Dacoit' challenges Ranveer Singh's 'Dhurandhar 2'; earns ₹12 crore.

Web Summary : Adivi Sesh and Mrunal Thakur's 'Dacoit' is performing well at the box office, earning over ₹12 crore in two days. It challenges Ranveer Singh's 'Dhurandhar 2'. The film's Telugu and Hindi versions are especially popular, driven by strong performances and a compelling action-drama story.
टॅग्स :धुरंधर सिनेमामृणाल ठाकूररणवीर सिंगबॉलिवूड