Join us  

मोगॅम्बो खुश हुआ...! लवकरच येणार ‘मिस्टर इंडिया 2’

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 3:15 PM

हा सुपरस्टार साकारणार लीड रोल

ठळक मुद्दे‘मिस्टर इंडिया’ हा आयकॉनिक सिनेमा 25 मे 1987 रोजी प्रदर्शित झाला होता. अनिल कपूर व श्रीदेवी या सिनेमात लीड रोलमध्ये होते. 

अनिल कपूर आणि श्रीदेवी यांचा ‘मिस्टर इंडिया’ या सुपरडुपर हिट चित्रपटाला कोण बरे विसरू शकणार? आजही या चित्रपटाच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत. दीर्घकाळापासून ‘मिस्टर इंडिया’चा सीक्वल येणार, अशी चर्चा सुरु आहे. साहजिकच हा सीक्वल कधी येणार, कसा असणार, असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. पण आता फार प्रतीक्षा करण्याची गरज नाही. होय, ‘मिस्टर इंडिया’चे निर्माते बोनी कपूर यांनी या चित्रपटाचा सीक्वल बनवण्यास नकार दिला असला तरी दिग्दर्शक अली अब्बास जफर मात्र ‘मिस्टर इंडिया 2’ बनवणार आहे.

बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, अली अब्बास जफर लवकरच ‘मिस्टर इंडिया 2’ हा सिनेमा घेऊन येणार आहे. हा त्याचा ड्रिम प्रोजेक्ट असून यासाठी त्याने रणवीर सिंगचा नावाला पसंती दिली आहे.

वृत्तानुसार, चित्रपटाची कथा व प्री-प्रॉडक्शनचे काम सुरु झाले आहे. एवढेच नाही तर स्क्रिप्टचा पहिला ड्राफ्टही तयार आहे. हा चित्रपट बिग बजेट सिनेमा असेल. अगदी भव्यदिव्य रूपात तो पडद्यावर साकारला जाईल. या चित्रपटात अली अब्बास अनिल कपूरच्या भूमिकेसाठी रणवीर सिंगला कास्ट करू इच्छितो. मोगॅम्बोच्या भूमिकेसाठी मात्र त्याचा शोध सुरु आहे. सगळे काही जमून आले तर 2022 मध्ये हा सिनेमा रिलीज होईल.

‘मिस्टर इंडिया 2’शिवाय अली अब्बासने एका फिमेल सुपरहिरो चित्रपटावरही काम सुरु केले आहे. या चित्रपटात कतरीना कैफ लीड रोलमध्ये दिसणार आहे.‘मिस्टर इंडिया’ हा आयकॉनिक सिनेमा 25 मे 1987 रोजी प्रदर्शित झाला होता. अनिल कपूर व श्रीदेवी या सिनेमात लीड रोलमध्ये होते. 

टॅग्स :रणवीर सिंगअली अब्बास जाफरअनिल कपूर