Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या डोळ्यादेखत झाला लेकीचा मृत्यु; आता अशी झालीये तिची अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 13:19 IST

Moushumi chatterjee: मौसमी यांनी पायल आणि मेघा या दोन मुली होत्या. त्यापैकी त्यांच्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. परिणामी, मौसमी या डिप्रेशनमध्ये गेल्या.

आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने ७०-८० चा काळ गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मौसमी चटर्जी (moushumi chatterjee). विशेष म्हणजे करिअरच्या कारकिर्दीत मौसमी यांचं नाव कधीही कोणत्या अभिनेत्यासोबत जोडलं गेलं नाही. त्यामुळे स्वच्छ चारित्र्य म्हणून त्यांची खास ओळख होती. असंख्य सुपरहिट देणाऱ्या या अभिनेत्रीने खऱ्या आयुष्यात अनेक दु:ख झेलली. इतकंच नाही तर तिच्या लेकीचा तिच्या डोळ्यादेखत मृत्यू झाला.  

मौसमी यांचं खरं नाव इंदिरा चट्टोपाध्याय असं होतं. कोलकात्तामध्ये लहानाच्या मोठ्या झालेल्या इंदिरा यांनी कलाविश्वात येण्यापूर्वी मौसमी हे नाव धारण केलं. वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी निर्माते जयंत मुखर्जी यांच्याशी लग्न केलं आणि संसार थाटला. मात्र, या संसारात त्यांच्या लेकीची त्यांना फार कमी काळापर्यंत साथ मिळाली. मौसमी यांनी पायल आणि मेघा या दोन मुली होत्या. त्यापैकी त्यांच्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. परिणामी, मौसमी या डिप्रेशनमध्ये गेल्या.

कसा झाला मौसमीच्या लेकीचा मृत्यू

मौसमी यांच्या मोठ्या मुलीचा २०१९ मध्ये मृत्यू झाला. त्यांच्या लेकीला कित्येक वर्षांपासून डायबिटीस होता. ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. ऐन तरुणवयात लेकीला गमावल्यामुळे मौसमी यांना जबर धक्का बसला. परिणामी, त्या डिप्रेशनमध्ये गेल्या.

दरम्यान, मौसमी आज कलाविश्वापासून प्रचंड लांब गेल्या आहेत. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये 'घर एक मंदिर', 'मंझिल', 'अनुराग', 'रोटी कपडा और मकान' आणि 'प्यासा सावन' यांसारख्या अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं.

टॅग्स :मौसमी चॅटर्जीबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा