Join us
Daily Top 2Weekly Top 5

मिथुनचा मुलगा महाअक्षयचे लग्न संकटात; अटकपूर्व जामीन नाकारला! भावी सासू म्हणते, लग्न होणारचं!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 16:50 IST

येत्या ७ जुलैला मिथुन चक्रवर्तीचा मुलगा महाअक्षय याचे लग्न होतेय. लग्नाची तयारी पूर्ण झालीय.  विधी सुरु झाल्या आहेत. उद्या महाअक्षयची संगीत सेरेमनी आहे. पण संगीत सेरेमनीच्या आदल्यादिवशी महाअक्षयला एक मोठा धक्का बसला आहे.

येत्या ७ जुलैला मिथुन चक्रवर्तीचा मुलगा महाअक्षय याचे लग्न होतेय. लग्नाची तयारी पूर्ण झालीय.  विधी सुरु झाल्या आहेत. उद्या महाअक्षयची संगीत सेरेमनी आहे. पण संगीत सेरेमनीच्या आदल्यादिवशी महाअक्षयला एक मोठा धक्का बसला आहे. होय, मुंबई उच्चन्यायालयाने महाअक्षय व त्याची आई योगिता बाली या दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.एका भोजपुरी अभिनेत्रीने महाअक्षय व योगिता बाली या दोघा मायलेकावर बलात्कार, फसवणूक व गर्भपात करणास सक्ती केल्याचा आरोप केला आहे. दिल्लीच्या रोहिणी कोर्टाच्या आदेशावरून लग्नाच्या ऐन पाच दिवसांआधी याप्रकरणी महाअक्षय व योगिता बाली यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे महाअक्षय व योगिता बाली या दोघांनाही अटक होण्याची शक्यता आहे. ही अटक टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात दोघांच्या अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. पण न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला आहे.आता याप्रकरणी काय कायदेशीर कारवाई होते, ते अजून स्पष्ट झालेले नाही. पण एक मात्र खरे, या प्रकरणामुळे महाअक्षयच्या येत्या ७ तारखेला होणारे लग्न संकटात आले आहे. भावी सासूबाई म्हणते, लग्न होणारचं‘यस बॉस’, ‘नदिया के पार’ फेम अभिनेत्री शीला शर्मा यांची मुलगी मदालसा शर्मासोबत महाअक्षयचे लग्न होणार आहे. पण ऐन लग्नाच्या तोंडावर महाअक्षयवर बलात्कारासारखा गंभीर आरोप झाल्याने हे लग्न होणार की नाही, याबद्दल संशय निर्माण झाला होता. पण हे लग्न होणार, असे महाअक्षयची भावी सासू शीला शर्मा यांनी स्पष्ट केले आहे. महाअक्षय तक्रारकर्तीला २०१५ मध्ये भेटला होता. आम्हाला या प्रकरणाची कल्पना आहे. त्याच्या लग्नात विघ्न आणण्यासाठी ऐन लग्नाच्या तोंडावर हे प्रकरण बाहेर काढण्यात आले आहे. आम्हाला सत्य काय ते माहित असल्याने महाअक्षय व मदालसाचे लग्न रद्द होण्याचे कारणचं नाही. हे लग्न ठरलेल्या तारखेलाचं होईल, असे शीला शर्मा यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :मिथुन चक्रवर्तीबॉलिवूडमदालसा शर्मा