Join us

'मिशन राणीगंज' मधील 'कीमती' गाणं रिलीज, परिणीती-अक्कीच्या रोमँटिक केमिस्ट्रीने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 16:09 IST

'मिशन राणीगंज' सिनेमातील 'कीमती' या गाण्याची सध्या चर्चा आहे.

अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra)  यांचा 'मिशन राणीगंज' (Mission Raniganj) सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय. सिनेमातील पहिलं गाणं रिलीज झालं आहे. यामध्ये अक्षय आणि परिणीती रोमान्स करताना दिसत आहेत. 'केसरी' नंतर पुन्हा अक्षय आणि परिणीतीची रोमँटिक केमिस्ट्री बघायला मिळत आहे. 

'मिशन राणीगंज' सिनेमातील 'कीमती' या गाण्याची सध्या चर्चा आहे. परिणीतीने यामध्ये साधी साडी नेसली असून केसांचा बन बांधून गजरा लावला आहे. ती खूपच आकर्षक दिसत आहे. बागेतलं शूट तर कधी एकमेकांच्या मिठीत कपल तल्लीन झालेलं बघायला मिळत आहे. गाण्याचं पिक्चरायझेशन जबरदस्त आहे. गाणं रिलीज होताच काही मिनिटांतच व्हायरल झालं आहे. 

'मिशन राणीगंज' पश्चिम बंगालमधील 1989 च्या राणीगंज कोलफील्ड्वर आलेल्या आपत्तीवर आधारित आहे. अक्षय कुमारने सिनेमात जसवंत सिंहच्या भूमिकेत आहे तर परिणीती त्याच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. टीनू सुरेश देसाई यांनी सिनेमा दिग्दर्शित केला आहे. ६ ऑक्टोबरला सिनेमा सर्वत्र रिलीज होतोय. 

काही दिवसांपूर्वीच सिनेमाचा टीझर रिलीज झाला. अक्कीच्या चाहत्यांना सिनेमा रिलीज कधी होतोय याची आतुरता आहे. अक्षयच्या नुकताच रिलीज झालेल्या 'ओएमजी 2' सिनेमानेही चांगली कमाई केली आहे.

टॅग्स :परिणीती चोप्राअक्षय कुमारसिनेमा