Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नानंतर अवघ्या वर्षभरात शाहिदला सोडचिठ्ठी देणार होती मीरा; अभिनेत्याने सांगितलं त्यामागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 10:17 IST

Shahid kapoor: मीरा तिच्या निर्णयावर ठाम होती. मात्र, शाहिदने तिची बरीच समजूत घातली त्यानंतर तिने तिचा निर्णय मागे घेतला.

बॉलिवूडमधील पॉवरफूल कपल म्हणून अभिनेता शाहिद कपूर (shahid kapoor) आणि मीरा राजपूत या जोडीकडे पाहिलं जातं. मीरा आणि शाहिदने २०१५ मध्ये लग्नगाठ बांधली. तेव्हापासून ही जोडी सातत्याने या ना त्या कारणामुळे चर्चेत येत असते. सध्या सोशल मीडियावर मीराची चर्चा होतीये. लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांमध्येच मीरा शाहिदला कंटाळली होती आणि तिने त्याला सोडायचा निर्णय घेतला होता. एका मुलाखतीमध्ये शाहिदने हा किस्सा सांगितला होता.  

२०१५ मध्ये शाहिदने कुटुंबाच्या मर्जीने दिल्लीच्या मीरा राजपूतसोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर काही महिन्यांमध्येच त्याचा उडता पंजाब हा सिनेमा रिलीज झाला. विशेष म्हणजे या सिनेमात शाहिदची भूमिका पाहून मीरा प्रचंड हादरुन गेली होती. तिच्या मनावर या सगळ्याचा इतका परिणाम झाली की तिने चक्क शाहिदपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.

'उडता पंजाब' पाहिल्यानंतर मीरा कटाक्षाने शाहिदला टाळू लागली होती. तो दिसला की ती त्याच्यापासून दूर पळायची. इतकंच नाही तर याच्यापुढे शाहिदसोबत रहायचं नाही असाही निर्णय तिने घेतला होता.

"उडता पंजाबमध्ये मी जी भूमिका साकारली होती ती पाहून मीरा थक्क झाली होती. मुळात खऱ्या आयुष्यातही मी असाच असेन असा तिचा समज झाला होता ज्यामुळे तिने चक्क मला सोडायचा निर्णय घेतला होता. पण, नंतर मग मी तिची समजूत काढली आणि या भूमिकेचा माझ्या खऱ्या आयुष्याशी संबंध नाही हे तिला समजावलं. त्यानंतर तिने तिचा निर्णय बदलला", असं शाहिद म्हणाला.

दरम्यान, शाहिद आणि मीरा आज सुखाने संसार करत असून त्यांना दोन मुलंदेखील आहेत. शाहिद आज लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो.  अलिकडेच रिलीज झालेला कबीर सिंह हा त्याचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला.

टॅग्स :बॉलिवूडशाहिद कपूरमीरा राजपूतसेलिब्रिटीसिनेमा