Join us

नाद खुळा!! ‘पुष्पा’मधील ‘श्रीवल्ली’ गाण्याचं मराठी व्हर्जन पाहिलं का?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 15:38 IST

Srivalli Song From Pushpa Marathi Version: सगळीकडे क्रेझ आहे ती ‘श्रीवल्ली’ या गाण्याची. आता श्रीवल्ली हे गाणं चक्क मराठीतही साकारलं आहे. पाहा 'श्रीवल्ली'चं मराठमोळं व्हर्जन

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाचा ‘पुष्पा’ (Pushpa The Rise) हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. ‘पुष्पा’तील गाण्यांनीही नुसती धूम केली आहे. सामंथा प्रभुच्या या चित्रपटातील आयटम साँगची चर्चा आहेच पण त्याशिवाय  सामी सामी आणि श्रीवल्ली (Srivalli Song From Pushpa) गाण्यांनाही चाहत्यांची मोठी पसंती मिळाली आहे. या गाण्यावरच्या अनेक रिल्स सोशल मीडियावर शेअर होत आहेत. आता काय तर ‘श्रीवल्ली’ या गाण्याचं मराठी व्हर्जन आलं आहे आणि हे मराठी व्हर्जनही तुफान व्हायरल होत आहे. ( Srivalli Song From Pushpa Marathi Version)

पुष्पा हा सिनेमा तेलगू, तामिळ, मल्याळम, हिंदीत प्रदर्शित झाला. या सर्वच भाषेत चित्रपटाची गाणी डब करण्यात आलीत. मात्र एका अवलियाने ‘श्रीवल्ली’चं मराठी व्हर्जन बनवलं आहे आणि या मराठी गाण्यानं सर्वांनाच वेड लावलं आहे.

विजय खंदारे याने त्याच्या युट्यूब चॅनलवर ‘श्रीवल्ली’चं मराठी व्हर्जन पोस्ट केलं आहे. एक गावातील प्रेमकथा या गाण्यात दाखवली आहे. सुमारे 3 मिनिटं 44 सेकंदाचं हे गाणं विजयने त्याच्या मोबाईल कॅमेऱ्यानं शूट केलं आहे. हे गाणं त्याने स्वत: लिहिलं व गायलं आहे. शिवाय यात त्याने अभिनय केला आहे. तृप्ती खंदारेने त्याला मस्त सोबत दिली आहे. अमरावतीमधील श्रीनिवास स्टुडिओमध्ये  श्रीवल्ली  गाण्याचं मराठी व्हर्जन रेकॉर्ड करण्यात आलंय. हे गाणं सोशल मीडियावर जबरदस्त लोकप्रिय झालं आहे. अवघ्या काही दिवसांत या गाण्याला ९ लाखांवर व्ह्युज मिळाले आहेत तर 52 हजार लोकांनी या गाण्याला लाईक केलं आहे. 

टॅग्स :अल्लू अर्जुनTollywoodरश्मिका मंदाना