Join us
Daily Top 2Weekly Top 5

मन्नाराची बर्थडे पार्टी अन् प्रियंका-निकच्या एन्ट्रीनेच घेतली लाईमलाईट, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2024 09:55 IST

मन्नाराच्या बिग बॉस प्रवासात प्रियंकाने तिला पाठिंबा दिला होता.

'बिग बॉस 17' फेम मन्नारा चोप्राने (Mannara Chopra)  काल ३३ वा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला. मन्नाराच्या कुटुंबियांनी आणि मित्रपरिवाराने काल मुंबईत खास तिच्यासाठी पार्टी आयोजित केली होती. या पार्टीची खरी शोभा वाढवली ती प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनस (Nick Jonas) यांनी. होय मन्नाराला शुभेच्छा देण्यासाठी बहीण प्रियंका चोप्रा पतीसह पोहोचली. त्यामुळे वाढदिवस मन्नाराचा पण सर्व लाईमलाईट प्रियंका-निकच घेऊन गेले. पार्टीत केवळ त्यांचीच चर्चा होती.

प्रियंका चोप्रा पती निक आणि लेक मालतीसह सध्या भारतात आली आहे. तिने होळी पार्टी असो किंवा फरहान अख्तरची भेट किंवा अन्य इव्हेंट्स अटेंड केले. मन्नारा चोप्राचा बिग बॉसमधील प्रवास सुरु असताना प्रियंकाने सोशल मीडियावर पोस्ट करत बहिणीला पाठिंबा दिला होता. तर आता भारतात असताना बहिणीची  बर्थडे पार्टी कशी चुकवणार म्हणत तिने पार्टीत हजेरी लावली. यावेळी तिची आई मधू चोप्राही सोबत होती. प्रियंका मन्नाराची मामेबहीण आहे. पार्टीत निक जोनासनेही खास लक्ष वेधले. निक तर भारतीयांचा खूपच लाडका आहे. चाहत्यांनी 'जिजू जिजू' अशी त्याला हाक दिली. तेव्हा त्याची रिअॅक्शनही खूपच क्युट होती. निक-प्रियंकाने पार्टीत सोबत डान्सही केला. प्रियंकाने पांढऱ्या रंगाचा खूपच हॉट टू पीस ड्रेस परिधान केला होता. तिच्या फॅशन सेन्सकडेही अनेकांचं लक्ष गेलं. याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

प्रियंका आणि निक आणखी काही दिवस भारतातच आहेत. फरहान अख्तरच्या आगामी 'जी ले जरा' सिनेमासाठी प्रियंकाने त्याची भेटही घेतली. हा सिनेमा खरंच ऑन फ्लोअर येणार का याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. या सिनेमात प्रियंका, कतरिना कैफ आणि आलिया भट अशा तीन आघाडीच्या अभिनेत्रींना कास्ट करण्यात आलं आहे.

 

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनासबॉलिवूडसेलिब्रिटीसोशल मीडिया