Join us
Daily Top 2Weekly Top 5

हुशार ते नेटकरी ! मलायकाच्या फॅशनमध्ये काढली 'ही' भयानक चुक; लहान मुलांच्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 16:47 IST

बॉलिवुड कलाकारांची पार्टी म्हणल्यावर कलाकारांची भन्नाट फॅशन ही आलीच.

बॉलिवुडचा प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्री च्या पार्टीत अनेक कलाकारांनी हजेरी लावली. मनिषच्या वाढदिवसानिमित्त ही पार्टी होती. मलायका अरोरा, करण जोहर, करिना कपुर, रेखा, काजोल, शिल्पा शेट्टी असे अनेक जण या पार्टीत सामील झाले. बॉलिवुड कलाकारांची पार्टी म्हणल्यावर कलाकारांची भन्नाट फॅशन ही आलीच. याही पार्टीत काही अभिनेत्रींना ट्रोल करणाात आले आहे. त्यातलेच एक नाव म्हणजे मलायका अरोरा.

मलायका अरोरावर युजर्स का भडकले ?

मलायका अरोरा पार्टीत एक वन पीस घालून आली होती. पण तिच्या ड्रेसवर असे काही लिहिले होते ज्यामुळे नेटकरी जाम भडकले. पार्टीत मलायकाने 'बैलेंसिएगा' या प्रसिद्ध फॅशन ब्रॅंडचा वन पीस घातला होता. वन पीसवर ब्रॅंडचे नावही होते. हे बघुन नेटकरी भडकले आहेत. कारण या ब्रॅंडने नुकतेच त्यांच्या एका जाहिरातीत लहान मुलांवर वाईट परिणाम करणारे कंटेट दाखवले होते. यानंतर मोठा गदारोळ झाला होता. आता मलायकाने याच ब्रॅंडचा ड्रेस घातल्याने युझर्स चिडले आणि तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले.

ट्विटरवर मलायका ट्रोल

मलायकाच्या या ड्रेसवर लगेच ट्विटर प्रतिक्रिया येऊ लागल्या. नेटकरी पण किती हुशार आहेत मलायकाने त्याच ब्रॅंडचा ड्रेस घातला आहे आणि त्या ब्रॅंडवर काय आरोप आहेत याची सगळी माहिती युजर्सला आहे.

मलायका अरोराशिवाय अभिनेत्री शिल्पा शेट्टीही ट्रोल झाली आहे. तिने पार्टीत घातलेली जीन्स नेटकऱ्यांच्या पचनी पडली नाही. उर्फी कडुन प्रेरणा घेतली का असे म्हणत शिल्पावरही चाहते भडकले. 

टॅग्स :फॅशनमलायका अरोराट्रोलसोशल मीडिया