मलायका अरोरा (Malaika Arora) हे नाव जवळपास सर्वांनाच माहित आहे. अनेक कारणांमुळे ती सोशल मीडियावर चर्चेत असते. मलायका वयाच्या पन्नाशीतही कमालीची हॉट आणि बोल्ड दिसते. योग, व्यायाम यामुळे तिचा फिटनेस जबरदस्त आहे. तिला २२ वर्षांचा एक मुलगा आहे यावर अनेकांना विश्वासही बसत नाही. सध्या ती लेकासोबत व्हेकेशन एन्जॉय करत आहे याचे तिने काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिचे कपडे पाहून लोकांनी तिला ट्रोल केलं आहे.
मलायका अरोरा इटलीमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे. तिच्यासोबत तिचा मुलगा अरहान खानही आहे. अरहान २२ वर्षांचा आहे. दोघंही कधी सायकल चालवत आहेत तर कधी स्वीमिंगचा आनंद घेत आहेत. इटलीतील निसर्गरम्य सौंदर्याची झलकही त्यांनी दाखवली आहे. तसंच वेगवेगळ्या अन्नपदार्थांचा आस्वाद ते घेत आहेत. या सगळ्याचे फोटो मलायकाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. एका फोटोत ती ब्रालेट टॉप मध्ये दिसत आहे. तर आणखी एका फोटोत ती हा अगदीच बोल्ड फोटो असून यावरुनच तिला ट्रोल करण्यात येत आहे.
'२२ वर्षांच्या लेकासमोर असे कपडे, शोभतं का?','तुझ्यावर असेच कपडे शोभून दितात.','मलायका तुला कमेंट्स चांगल्या वाटतायेत का? एक फेज असते, वय असतं, आता तुझा मुलगा २० वर्षांचा आहे, हे सगळं बंद कर' अशा कमेंट्स तिच्या फोटोंवर आल्या आहेत.
मलायका अरोराचा २०१७ साली अरबाज खानसोबत घटस्फोट झाला. यानंतर ती अर्जुन कपूरला डेट करत होती. अर्जुनपेक्षा मलायका १२ वर्षांची मोठी आहे. दोघांना त्यांच्या वयातील अंतरामुळे खूप ट्रोल केलं गेलं. मात्र दोघं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. त्यांच्या लग्नाच्याही चर्चा होत्या. अचानक गेल्यावर्षी त्यांचं ब्रेकअप झालं.