बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गेल्या काही काळापासून मलायकाचे नाव हिरे व्यापारी हर्ष मेहतासोबत जोडले जात असतानाच, आता तिचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये मलायका एका तरुणासोबत डान्स करताना आणि कोजी होताना दिसत आहे. नुकताच रोममध्ये हर्ष मेहतासोबत व्हॅलेंटाईन डे साजरा केल्याच्या चर्चांनंतर या नवीन व्हिडिओने नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
हा व्हायरल व्हिडिओ मलायका अरोराच्या नवीन रेस्टॉरंट 'स्वीनी बॉम्बे'च्या (Sweeney Bombay) ग्रँड लॉन्च पार्टीतील आहे. या पार्टीत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. व्हिडिओमध्ये मलायका ज्या तरुणासोबत डान्स करताना दिसत आहे, तो हर्ष मेहता नसून दुसराच कोणीतरी असल्याने सोशल मीडियावर विविध तर्कवितर्क लढवले जात होते. मलायकाचा हा बोल्ड आणि बिनधास्त अंदाज पाहून तिने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
मलायकासोबत दिसणारा हा 'मिस्ट्री मॅन' दुसरा कोणी नसून 'स्प्लिट्सविला' फेम सोराब बेदी आहे. दोघांमधील केमिस्ट्री पाहून सोराब हा मलायकाचा नवीन बॉयफ्रेंड आहे का? अशी चर्चा सुरू झाली होती. कारण यामध्ये सोराब मलायका एकमेकांच्या मिठीत गाण्यावर ठेका धरत आहेत. मात्र, या केवळ अफवा असल्याचे समोर आले आहे. सोराबने स्वतः या पार्टीचे फोटो शेअर करून मलायकाला शुभेच्छा दिल्या आहेत.
मात्र व्हिडीओत मलायकाला अशा प्रकारे नवीनच मिस्ट्री मॅनसोबत पाहून नेटकऱ्यांनी तिच्यावर चांगलीच टीका केली आहे. मलायकाला तिच्या वयाची आठवण करुन दिली आहे. तर दुसरीकडे सोराब बेदीची गर्लफ्रेंड निहारिकाला टॅग करुन नेटकऱ्यांनी तिचं लक्ष इकडे वेधून घेतलं.
विशेष म्हणजे, या लॉन्च पार्टीला मलायकाचा रुमर्ड बॉयफ्रेंड हर्ष मेहता देखील उपस्थित होता. पार्टी संपल्यानंतर मलायका आणि हर्ष एकत्र बाहेर पडले आणि एकाच गाडीतून रवाना झाले. मलायका (५२ वर्षे) आणि हर्ष (३३ वर्षे) यांच्या वयात १९ वर्षांचे अंतर आहे. वारंवार एकत्र स्पॉट होऊनही मलायकाने अद्याप आपल्या नात्याबद्दल अधिकृत वक्तव्य केलेले नाही. मात्र, या नव्या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा मलायकाचे नाव सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.
Web Summary : Malaika Arora's video with Sorab Bedi at her restaurant launch went viral, fueling dating rumors. Despite recent Valentine's celebrations with Harsh Mehta, this new connection has grabbed attention. Netizens criticized Malaika, linking Bedi's girlfriend. Mehta also attended the party, leaving with Malaika.
Web Summary : मलाइका अरोड़ा का सोराब बेदी के साथ उनके रेस्टोरेंट लॉन्च पर वीडियो वायरल हुआ, जिससे डेटिंग की अफवाहें उड़ीं। हर्ष मेहता के साथ हाल के वैलेंटाइन डे समारोह के बावजूद, इस नए कनेक्शन ने ध्यान खींचा है। नेटिज़न्स ने मलाइका की आलोचना की, बेदी की गर्लफ्रेंड को लिंक किया। मेहता ने भी पार्टी में भाग लिया, मलाइका के साथ रवाना हुए।