Join us

So Cute! २०२० वर्षाच्या शेवटच्या दिवशी मलायका अरोराने शेअर केला सर्वात खास फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 16:26 IST

आता मलायकाने या वर्षाच्या शेवटच्या दिवशी एक क्यूट फोटो शेअर केला. या फोटोत तिच्यासोबत एक क्यूट कुत्राही दिसत आहे.

नेहमीच आपल्या फिटनेस, डान्स आणि बोल्ड फोटोंमुळे चर्चेत राहणारी मलायका अरोरा सध्या गोव्यात फॅंमिलीसोबत एन्जॉय करत आहे. फॅमिलीसोबत इथे तिच्यासोबत बॉयफ्रेन्ड अर्जुन कपूरही आहे. काही दिवसांपासून ती इन्स्टाग्रामवर गोव्यातील खास फोटो शेअर करत आहे. आता तिने या वर्षाच्या शेवटच्या दिवशी एक क्यूट फोटो शेअर केला. या फोटोत तिच्यासोबत एक क्यूट कुत्राही दिसत आहे.

मलायकाने २०२० च्या शेवटच्या दिवशी म्हणजे ३१ डिसेंबरच्या दिवशी तिच्या डॉगीसोबतचा फोटो शेअर केला आहे. तिने याला कॅप्शन दिलंय की, ''kisses आणि प्रेम,  यावर्षातला शेवटचा दिवस'.

मलायका अरोरा सध्या न्यू ईअर सेलिब्रेशनसाठी गोव्यात आहे. पहिल्यांदाच ती अर्जुन कपूर आणि फॅमिलीसोबत एकत्र फिरायला गेली आहे. मलायकाने नुकताच एक ग्रीन ड्रेसमधील बोल्ड फोटो शेअर केला असून त्यावरून लोक तिला ट्रोल करत आहेत. काही लोक तिला फुलगोबी म्हणत आहेत. तर काही पोपट. याआधी तिने स्वीमिंग पूलमधील फोटो शेअर केले होते ज्यावर फॅन्सच्या भरभरून कमेंट आल्या होत्या. (Flashback 2020 : २०२० मध्ये सर्वात जास्त रंगली मलायकाच्या या बोल्ड फोटोजची चर्चा.....)

मलायका अरोरासाठी हे वर्ष तसं फार चांगलं किंवा फार वाईट गेलं नाही. तिला कोरोनाची लागण झाली होती. तेव्हा ती होम क्वारंटाइन होती. अभिनेता अर्जुन कपूरला कोरोनाची लागण झाली होती. ती त्याच्या संपर्कात आल्याने तिला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे ती बरेच दिवस इंडियाज बेस्ट डान्सर शोमधून बाहेर होती. पण नंतर बरी झाल्यावर पुन्हा तिने शोमध्ये जज म्हणून एन्ट्री घेतली होती. 

टॅग्स :मलायका अरोराबॉलिवूडसोशल मीडिया