Join us  

'या' व्यक्तीमुळे माहिरा खानच्या पदरात पडला 'रईस' सिनेमा; नाव ऐकून तुम्हीदेखील व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2024 5:30 PM

माहिरा खान ही शाहरूखची खूप मोठी फॅन आहे.

पाकिस्तानी चित्रपटसृष्टीत अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांनी भारतातही नाव कमावलं आहे.  अशीच एक अभिनेत्री म्हणजे माहिरा खान. 'रईस' चित्रपटात अभिनेता शाहरुख खानसोबत (Shah Rukh Khan) काम  करायला मिळालं आणि माहिरा खान (Raees Fame Actress Mahira Khan) रातोरात हीट झाली होती. शाहरुख खानसोबत स्क्रिन शेअर करणे हे माहिरा खानसाठी स्वप्नापेक्षा कमी नव्हतं. पण, माहिराला हा चित्रपट कोणामुळे मिळाला हे तुम्हाला माहीत आहे का? 

माहिरा खान ही शाहरूखची खूप मोठी फॅन आहे आणि म्हणूनच तिला जेव्हा 'रईस' चित्रपटाची ऑफर आली तेव्हा तिच्या आनंदाला सीमाच राहिली नाही. माहिरा खानला 'रईस' चित्रपट हा शाहरुख खानच्या सासूमुळे मिळाला होता. गौरी खानची आई सविता छिब्बर यांनी शाहरुखला या चित्रपटात माहिराला कास्ट करण्याचा सल्ला दिला होता. 

खुद्द माहिरानेच एका मुलाखतीत याचा खुलासा केला. ती म्हणाली, "हमसफरच्या प्रमोशनसाठी मी भारतात गेले होते. जेव्हा मी तिथे गेले होते. तेव्हा मला सिनेमासाठी कॉल आला. त्यांनी मला टीव्हीवर पाहिलं होतं. शाहरुख खानच्या सासू सविता छिब्बर यांनी मला हमसफरमध्ये पाहिलं होतं. तेव्हा त्यांनी सिनेमासाठी माझा विचार करण्याचा सल्ला दिला होता. या सिनेमासाठी अनेकांनी ऑडिशन दिलं होतं".

माहिरा खान 2017 मध्ये शाहरुख खानसोबत रईस या चित्रपटात दिसली होती. माहिराने व्हीजे म्हणून करिअरची सुरुवात एमटीव्ही पाकिस्तानबरोबर केली होती. 2011 मध्ये बोल या पाकिस्तानी चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. फवाद खानसोबतच्या 'हमसफर' या टीव्ही शोने तिला लोकप्रियता मिळवून दिली. माहिरा खानचे पाकिस्तानात नाही, तर भारतातही जबरदस्त फॅन फॉलोवर्स आहेत.  ती पाकिस्तानची एक सुंदर अभिनेत्री आहे.  नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने ती चर्चेत असते.  

टॅग्स :माहिरा खानसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमाशाहरुख खानपाकिस्तानगौरी खान