सोशल मीडयावर सिनेमा, त्यातील किस्से वा कलाकारांच्या आयुष्यातील प्रसंग यांची कायमच चर्चा रंगत असते. यात खासकरुन एखाद्या जुन्या सिनेमाच्या कलाकारांचं रियुनियन झालं की त्यांच्याविषयीच्या चर्चांना उधाण येतं. यामध्येच सध्या नेटकऱ्यांमध्ये धडकन गर्ल्सची चर्चा रंगली आहे.
2000 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेला 'धडकन' हा सिनेमा प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात असेल. शिल्पा शेट्टी (shilpa shetty), सुनील शेट्टी(suniel shetty), अक्षय कुमार (akshay kumar) आणि महिमा चौधरी (mahima chaudhry) यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा त्याकाळी बराच गाजला होता. इतकंच नाही तर त्यातील गाणी आजही लोकप्रिय आहेत. विशेष म्हणजे तब्बल 25 वर्षानंतर या सिनेमातील अभिनेत्री एकत्र आल्या आहेत.
सोशल मीडियावर सध्या शिल्पा शेट्टी आणि महिमा चौधरी यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो महिमाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने 'धडकन इन 2026' असं कॅप्शन दिलं आहे. त्यामुळे या दोघींचं रियुनियन चांगलंच चर्चेत आलं आहे. महिमाने शेअर केलेल्या फोटोमध्ये दोन्ही अभिनेत्रींनी क्रीम कलरच्या आऊटफिटमध्ये ट्विनिंग केल्याचं दिसून येत आहे. यात महिमाने साडी नेसली आहे. तर, शिल्पाने सलवार-कुर्ता घातला आहे. त्यांचा हा फोटो चाहत्यांच्या पसंतीस पडत असून अनेकांनी कमेंट करत 'धडकनच्या सीक्वल कधी येणार?' असा प्रश्नही विचारला आहे.
दरम्यान, धडकन या सुपरहिट ठरलेल्या सिनेमामध्ये शिल्पा आणि महिमासोबत अक्षय कुमार, सुनील शेट्टी, शर्मिला टागोर, परमीत सेठी, किरण कुमार, सुषमा सेठ आणि मनजीत कुल्लर यांसारखे कलाकार झळकले होते.
Web Summary : Shilpa Shetty and Mahima Chaudhry, stars of the hit film 'Dhadkan,' reunited after 25 years. Mahima shared a photo on Instagram, captioning it 'Dhadkan in 2026,' sparking fan excitement. The actresses twinned in cream outfits, leading fans to question about a sequel.
Web Summary : हिट फिल्म 'धड़कन' की स्टार शिल्पा शेट्टी और महिमा चौधरी 25 साल बाद फिर से मिलीं। महिमा ने इंस्टाग्राम पर एक फोटो शेयर करते हुए इसे 'धड़कन इन 2026' कैप्शन दिया, जिससे प्रशंसक उत्साहित हो गए। क्रीम रंग की पोशाक में अभिनेत्रियों के मिलन ने प्रशंसकों को सीक्वल के बारे में सवाल करने पर मजबूर कर दिया।