Join us

Video: महेश बाबूच्या भावाला चप्पलने मारहाण; हॉटेलमध्ये परस्त्रीसोबत असताना पत्नीने पकडलं रंगेहात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 15:55 IST

Mahesh babu brother: पत्नीसोबत पटत नसल्यामुळे नरेश बाबू गेल्या काही दिवसांपासून हॉटेलमध्ये राहात होते. परंतु, या हॉटेलमध्ये ते एका परस्त्रीसोबत राहत असल्याचं समोर आलं.

दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू कायम त्याच्या दमदार अभिनयामुळे आणि चित्रपटामुळे चर्चेत येत असतो. मात्र,यावेळी तो त्याच्या सावत्र भावामुळे चर्चेत येत आहे. महेश बाबूचा मोठा भाऊ नरेश बाबू याला त्याच्या पत्नीने चारचौघात चप्पलेने मारहाण केली आहे. सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

नरेश बाबू सध्या त्यांच्या चौथ्या लग्नामुळे चर्चेत येत आहेत. नरेश बाबू आणि त्यांची तिसरी पत्नी राम्या रघुपती यांच्या नात्यात दुरावा आल्याचं सांगण्यात येतं. पत्नीसोबत पटत नसल्यामुळे नरेश बाबू गेल्या काही दिवसांपासून हॉटेलमध्ये राहात होते. परंतु, या हॉटेलमध्ये ते एका परस्त्रीसोबत राहत असल्याचं समोर आलं. इतकंच नाही तर त्यांचं सत्य समोर आल्यानंतर त्यांची तिसरी पत्नी राम्या हिने चारचौघांमध्ये त्यांना चप्पलेने मारहाण केली. विशेष म्हणजे राम्या यांना रोखण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी लागली.

घटनास्थळावर पोलिस दाखल

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये परस्त्रीसोबत नरेश बाबू यांना पाहिल्यानंतर राम्या यांनी राग अनावर झाला आणि त्यांनी त्याच क्षणी पतीला चप्पलेने मारहाण करण्यास सुरुवात केली. इतकंच नाही तर त्यांनी आरडाओरडा करुन या हॉटेलमध्ये गोंधळ माजवला. परिणामी, पोलिसांनी घटनास्थळावर जात राम्या यांना आडवलं.

चौथ्या लग्नाच्या विचारात आहेत नरेश बाबू

सूत्रांच्या माहितीनुसार, तीन लग्न केलेले नरेश बाबू आता चौथ्या लग्नाच्या तयारीला लागले आहेत. नरेश बाबू पवित्रा यांना डेट करत असून त्यांच्याशीच लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

महेश बाबूचा सावत्र भाऊ आहे नरेश

नरेश बाबू हा महेश बाबूचा सावत्र भाऊ आहे. नरेश हा दिवंगत अभिनेत्री विजया निर्मला यांच्या पहिल्या पतीचा मुलगा आहे. परंतु, पतीच्या निधनानंतर विजया यांनी अभिनेता कृष्णा यांच्याशी लग्न केलं. महेश बाबू, विजया आणि कृष्णा यांचा मुलगा आहे. नरेशदेखील महेश बाबूप्रमाणेच लोकप्रिय अभिनेता आहेत. त्यांनी आतापर्यंत तीन लग्न केली असून चौथ्या लग्नाच्या तयारीत आहेत. परंतु, या सगळ्या अफवा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच नरेश यांनी तिसरी पत्नी राम्या हिला घटस्फोटाची कायदेशीर नोटीसही पाठवली आहे.

टॅग्स :महेश बाबूTollywoodबॉलिवूडसेलिब्रिटी