Join us

कोट्यधीश अभिनेत्यावर अखेरच्या दिवसांत आली वृद्धाश्रमात राहण्याची वेळ, ‘महाभारता’च्या ‘इंद्रा’ची करुण कहाणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 17:53 IST

पत्नी घटस्फोटानंतर मुलाला घेवून अमेरिकेत निघून गेली अन्...; 'महाभारतात' इंद्राची भूमिका साकारणाऱ्या नायकाचा दुर्दैवी अंत

Satish Kaul: हिंदी चित्रपटसृष्टी ही उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी आहे, असं म्हटलं जातं.या क्षेत्रामध्ये ज्याची चलती असते त्यालाच संधीचे व्दार खुले असतात. मात्र,एखाद्या कलाकारावर वाईट वेळ आली तर चित्रसृष्टी तुमच्याकडे ढुंकूनही पाहात नाही. अशाच दुर्दैवी कलावंतांपैकी एक म्हणजे सतीश कौशल. पंजाबी चित्रपटांचा अमिताभ बच्चन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सतीश कौल महाभारत या लोकप्रिय हिंदी मालिकेत इंद्राची भूमिका साकारली होती. मात्र, या अभिनेत्यावर अखेरच्या दिवसांमध्ये त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट होती. त्यांना सांभाळायला देखील कोणीही तयार नव्हते. 

जवळपास ३०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या सतिश कौल  यांनी अमिताभ बच्चन तसेच दिलीप कुमार यांसारख्या दिग्गज कलाकारांबरोबर काम केलं होतं. सतीश कौल यांचा जन्म ८ सप्टेंबर १९४६ रोजी जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर येथे झाला.त्यांचे वडील हे प्रसिद्ध शायर होते. त्यांच्या वडिलांनी त्यांना शिक्षणासाठी पुण्यात पाठवले.त्यानंतर सतीश यांनी मुंबईनगरी गाठली. १९७३ मध्ये त्यांनी वेद राही दिग्दर्शित 'प्रेम पर्वत "या चित्रपटातून रेहाना सुलतान यांच्यासोबत रुपेरी पडद्यावर एन्ट्री घेतली. प्रेमपर्वतनंतर सतीश यांनी'फसला', 'दावत' , 'अंग से अंग लगा ले','वॉरंट', 'हर 'बहादूर जिसका नाम' या चित्रपटांच्या माध्यमातूनही प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.त्यांची पंजाबी चित्रपटातील कारकीर्द उत्तम सुरु असताना, त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत 'आग ही आग','इनाम दस हजार','कर्मा' 'हत्या' 'राम लखन'या सिनेमांमध्येही अभिनय केला.

पत्नी घटस्फोटानंतर मुलाला घेवून अमेरिकेत निघून गेली अन्...

काहीच वर्षांत त्यांचं लग्न झाले. त्यांच्या पत्नीच्या कुटुंबातील सगळे अमेरिकेत राहात होते. त्यामुळे आपण देखील अमेरिकेला कायमचे जावे असे त्यांचे म्हणणे होते. पण काही केल्या सतिश आपले अभिनय करियर सोडायला तयार नव्हते आणि त्याचमुळे त्यांच्या पत्नीत आणि त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि ते एकटे राहायला लागले. कोट्यवधी संपत्तीचा मालक असलेल्या या अभिनेत्याला आर्थिक संकटात सापडला होता. अखेरच्या दिवसांमध्ये सतीश कौल यांनी वृध्दाश्रमात राहण्यास सुरुवात केली. मात्र,२०२० मध्ये कोरोनाग्रस्त झाल्यावर वैद्यकीय खर्चासाठी त्यांना मदतीचे आवाहनही केले होते. दुर्दैवाने १० एप्रिल २०२१ रोजी कोरोनामुळे त्यांचं निधन झालं. 

टॅग्स :टेलिव्हिजनमहाभारतसेलिब्रिटी