Join us

माधुरी दीक्षितची दोन्ही मुलांसाठी भावनिक पोस्ट, अरिन आणि रायनसोबतचे फोटो केले शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 14:12 IST

माधुरी दीक्षितने दोन्ही मुलांसाठी भावूक पोस्ट शेअर केली आहे.

बॉलीवूडची धकधक गर्ल अर्थात माधुरी दीक्षित ही आपल्या अदाकारी आणि फिटनेससाठी ओळखली जाते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी माधुरी कायम सोशल मीडियावर तिचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. नुकतेच तिने दोन्ही मुलांसाठी भावूक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टला चाहत्यांचे भरभरुन प्रेम मिळत आहे. 

माधुरी दीक्षितने अरिन आणि रायनसोबतचे फोटोही शेअर केले आहेत. ज्यातील पहिल्या फोटोमध्ये माधुरी आणि मुले कॅमेऱ्यासमोर पोज देत आहेत. तर दुसऱ्या फोटोत माधुरी खळखळुन हसताना दिसत आहे.  अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहले की, "माय बॉइज. तुम्ही एवढ्या लवकर कॉलेजमध्येही पोहचलात. वेळ कसा गेला हे कळालेही नाही. आव्हानांना सामोरं जा आणि स्वत:ची प्रगती करा.  तुम्ही दोघांचा प्रवास पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि मला तुम्हा दोघांची खूप आठवण येईल. तुम्हा दोघांशिवाय घर पहिल्यासारखं राहणार नाही.’

विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वीच माधुरीचा धाकटा मुलगा रायन हायस्कूलमधून पदवीधर झाला आहे. तेव्हाही अभिनेत्रीने एक पोस्ट शेअर केली होती, जी चाहत्यांना खूप आवडली होती.

टॅग्स :माधुरी दिक्षितबॉलिवूडसिनेमा