सध्या सगळीकडे ‘जवान’ चित्रपटाची चर्चा आहे. प्रत्येकावर ‘जवान’ चित्रपटाचा प्रभाव पडला आहे. चाहत्यांनी चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात अक्षरशः गर्दी केली आहे. लोकं चित्रपटाचं कौतुक करताना थकत नाहीयेत. पहावं तिकडे शाहरुखच्या चाहत्यांची क्रेझ दिसून येत आहे. धक-धक गर्ल माधुरी दिक्षितहीशाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाच्या प्रेमात पडली आहे. माधुरीने शाहरुख खानचे भरभरुन कौतुक केले.
शाहरुखचा 'जवान' हा सिनेमा ब्लॉकबस्टर असल्याचं म्हटलं जात आहे. भारतात आणि भारताबाहेर या चित्रपटाला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवे विक्रम बनवेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जवान सिनेमाचे दिग्दर्शन साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक अॅटलीने केले आहे. अॅटली हा साऊथमधील मोस्ट डिमाडिंग दिग्दर्शकांपैकी आहे. तर चित्रपटात शाहरुख खान बरोबर अभिनेत्री नयनतारा प्रमुख भूमिकेत दिसली. तर दक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपतीने चित्रपटामध्ये नकारात्मक भूमिका साकारली आहे. दीपिका पादुकोण या चित्रपटांमध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकली असून मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओकही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसून आली.