लॉरेन्स बिश्नोई गँगने पुन्हा एकदा अभिनेता रणवीर सिंह आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांना धमकी दिली आहे. बिश्नोई गँगच्या 'हॅरी बॉक्सर'ची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत असून त्यात तो रणवीर आणि रोहितला धमकावताना ऐकायला येत आहे. या ऑडिओ क्लिपच्या सत्यतेची तपासणी केली जात असल्याचं मुंबई क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
काही दिवसांपूर्वीच निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबाराची घटना घडली होती, ज्यामध्ये बिश्नोई गँगचं नाव समोर आलं होतं. मात्र पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, आता परिस्थिती बदलली आहे. लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोई यांच्या अटकेनंतर ही गँग कमकुवत झाली आहे. त्यामुळे काही लोक केवळ भीतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी या गँगच्या नावाचा वापर करत असावेत, अशी शक्यताही मुंबईपोलिसांच्या काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
रणवीर सिंहला व्हॉइस नोटद्वारे धमकी
अभिनेता रणवीर सिंहला बिश्नोई गँगच्या नावाने मिळालेल्या धमकी प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्हॉइस नोटद्वारे त्याच्याकडे १ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. क्राईम ब्रांचच्या प्राथमिक तपासात असं समोर आलं आहे की, या व्हॉइस नोटमधील आवाज 'हॅरी बॉक्सर'च्या आवाजाशी मिळताजुळता आहे. तरीही या प्रकरणाची खात्री करण्यासाठी अधिकारी तांत्रिक आणि डिजिटल पुरावे गोळा करत आहेत.
रणवीर सिंहच्या सुरक्षेत वाढ
ही धमकी थेट रणवीर सिंहला नसून त्याच्या मॅनेजरच्या मोबाईल क्रमांकावर पाठवण्यात आली होती. रोहित शेट्टीच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर ही व्हॉइस नोट पाठवण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून रणवीर सिंहच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून पोलिसांनी त्याच्या मॅनेजरचा जबाबही नोंदवला आहे.
तपासादरम्यान असंही समोर आलं आहे की, हा मेसेज पाठवण्यासाठी VPN चा वापर करण्यात आला होता आणि त्याचे 'डिजिटल ट्रेल' परदेशातील लोकेशन दर्शवत आहेत. हा मेसेज पाठवताना कोणत्या देशाचा सर्व्हर वापरला गेला याचा शोध पोलीस घेत आहेत. गरज पडल्यास या प्रकरणात इंटरपोलची मदत घेतली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
Web Summary : Lawrence Bishnoi's gang allegedly threatened Ranveer Singh and Rohit Shetty, demanding extortion money. An audio clip purportedly of 'Harry Boxer' is under investigation. Police are increasing security for Singh, tracing the threat's origin, and considering Interpol's assistance.
Web Summary : लॉरेंस बिश्नोई गिरोह ने कथित तौर पर रणवीर सिंह और रोहित शेट्टी को धमकी दी, और फिरौती की मांग की। 'हैरी बॉक्सर' का एक ऑडियो क्लिप जांच के अधीन है। पुलिस सिंह की सुरक्षा बढ़ा रही है, खतरे की उत्पत्ति का पता लगा रही है, और इंटरपोल की सहायता पर विचार कर रही है।