बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ताचा कलाविश्वातील वावर पूर्वीपेक्षा फार कमी झाला आहे. मोजक्या सिनेमात काम करुन नावारुपाला आलेली लारा सोशल मीडियावर तुफान अॅक्टिव्ह आहे. त्यामुळे ती कायम चाहत्यांच्या संपर्कात येत असते. अलिकडेच तिने तिच्या लेकीसोबत सायरा भूपतिसोबतचा एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघी मायलेकींची भन्नाट जुगलबंदी पाहायला मिळत आहे.
लारा आणि सायरा या दोघींनी केंट जोन्सच्या 'Don’t Mind' या फेमस गाण्यावर डान्स केला आहे. हा व्हिडीओ लाराने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सोबतच तिने मजेशीर कॅप्शन दिलं आहे.
''आपल्या मुलांना खूश करण्यासाठी माणूस काय-काय नाही करत. हे म्हणजे तर आता आई-वडिलांसाठी निर्लज्जपणाची सीमा पार केल्यासारखं झालंय'',असं कॅप्शन लाराने दिलं आहे. तिच्या या कॅप्शनवरुन लेकीच्या आग्रहाखातर तिने हा डान्स केल्याचं दिसून येत आहे.
लाराने या व्हिडीओमध्ये ग्रे कलरचा लूज टी-शर्ट आणि नेव्ही कलरची लेगिंग्स परिधान केली आहे. तर, सायराने डार्क कलरची लेगिंग्स आणि ओव्हरसाईज ब्राऊन स्वेटशर्ट घातला आहे. लाराने माजी टेनिसपटू महेश भूपतिसोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर २०१२ मध्ये लाराने तिच्या लेकीला सायराला जन्म दिला.
दरम्यान, लारा मध्यंतरी 'रणनीति बालाकोट एंड बियॉन्ड' या सिनेमात झळकली होती. त्यानंतर लवकरच ती 'वेलकम टू द जंगल' या सिनेमात दिसणार आहे. अक्षय कुमार, वामिका गब्बी, दिशा पटानी अशी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा जून २०२६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसंच लारा नितेश तिवारीच्या रामायणमध्येही झळकणार आहे. या सिनेमात तिने कैकेयीची भूमिका साकारली आहे.
Web Summary : Lara Dutta shared a dance video with her daughter, Saira, on Instagram. The duo danced to Kent Jones' 'Don’t Mind.' Lara humorously captioned it about embarrassing oneself for their kids. She will be seen in 'Welcome To The Jungle' and 'Ramayana'.
Web Summary : लारा दत्ता ने बेटी सायरा के साथ इंस्टाग्राम पर एक डांस वीडियो शेयर किया। दोनों केंट जोन्स के 'डोंट माइंड' पर नाचे। लारा ने मजाकिया अंदाज में कैप्शन दिया कि बच्चे के लिए खुद को शर्मिंदा करना पड़ता है। वह 'वेलकम टू द जंगल' और 'रामायण' में दिखेंगी।