Join us
Daily Top 2Weekly Top 5

मोनालिसाच्या आंतरधर्मीय लग्नाबद्दल कुटुंबियांची प्रतिक्रिया समोर, म्हणाले-"आमच्या मुलीला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 12:25 IST

महाकुंभ गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोनालिसाने नुकतंच तिचा प्रियकर फरमान खानसोबत लग्न केलं आहे. या दोघांनी केरळला जाऊन हिंदू पद्धतीने विवाह केलं. यावर मोनालिसाच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

kumbh mela viral girl monalisa : २०२५ मध्ये महाकुंभमेळ्यात रुद्राक्ष माळा विकणाऱ्या एका मुलीचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. त्यानंतर या मुलीचं नशीब फळफळलं आणि तिला थेट चित्रपटाची ऑफर मिळाली. घारे डोळे आणि निखळ सौंदर्यामुळे चर्चेत आलेल्या मुलीचं नाव मोनालिसा भोसले होतं. त्यानंतर आता मोनालिसा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 

महाकुंभ गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोनालिसाने नुकतंच  तिचा प्रियकर फरमान खानसोबत लग्न केलं आहे. या दोघांनी केरळला जाऊन हिंदू पद्धतीने विवाह केलं. मात्र, त्यांच्या या लग्नानंतर हा लव्ह जिहाद असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. अशातच यावर मोनालिसाच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया समोर आली आहे. मोनालिसाचे कुटुंबिय तिच्या या निर्णयावर नाराज आहेत. आता, अलिकडेच माध्यमांशी बोलताना तिचे मोठे काका मोनालिसाच्या लग्नाबद्दल प्रतिक्रिया दिली.आमच्या मुलीला जाळ्यात अडकवून तिला फसवलं, असे आरोप त्यांनी यावेळी केले.

दरम्यान, मोनालिसाच्या लग्नाबद्दल बोलताना तिचे काका विजय भोसले म्हणाले, आमच्या मुलीला लव्ह जिहादमध्ये अडकवले गेलंय. तिला धमकी देण्यात आली असेल. कारण आमच्या समाजात असं कधीच घडलेलं नाही की आमच्यामुलीने दुसऱ्या  समाजात लग्न केलं आहे. आम्ही आमच्या मुलीला न्याय मिळावा, अशी मागणी आम्ही सरकारकडे करत आहोत.

त्यानंतर महेश्वरचे समाजसेवक मनोज पाटीदार यांनी देखील मोनालिसा-फरमानच्या लग्नाबाबत भाष्य केलं.त्यावेळी त्यांनी म्हटलं," हे कुटुंब बऱ्याच काळापासून येथे राहत आहे ते फारसे शिकलेले नाहीत. या तरुणीला मुद्दाम यात अडकवण्यात आलंय.आमच्या महेश्वर येथील  तरुणीवर अन्याय झाला आहे. तिची फसवणूक झाली आहे. आम्ही यावर कारवाईची मागणी करू." 

लग्नाबाबत मोनालिसाने दिलेलं स्पष्टीकरण...

मोनालिसा भोसले आणि पती फरमान खान यांनी लग्नानंतर माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी मोनालिसाने स्पष्ट केले की, "आमचं लग्न हिंदू पद्धतीने झालं आहे. खरं तर त्याला माझ्याशी लग्नच करायचं नव्हतं. पण मीच जबरदस्ती याच्याशी लग्न केलं. माझे वडील माझं लग्न कोणा दुसऱ्याशीच लावून देणार होते. पण मला तो मुलगा पसंत नव्हता. तो माझ्या आत्याचाच मुलगा होता. आत्याचा मुलगा म्हणजे माझा भाऊ झाला ना...म्हणून मी त्याच्याशी लग्नाला नकार दिला. माझे वडील माझ्यासोबतच आले होते. ते अजूनही इथेच आहेत पण ते लग्नाला आले नाहीत. मी लग्न केलंय हे त्यांना माहित आहे. ते सध्या जरा नाराज आहेत. काल ते आम्हाला भेटले होते.  मी हिंदू रिती रिवाजाप्रमाणे लग्न केलं आहे. सगळे जे लव्ह जिहाद बोलत आहे तसं काहीच नाहीये. आम्ही कलाकार आहोत आमच्यासाठी सर्व धर्म एकच आहे. मी सगळ्या धर्माला एक मानते."

टॅग्स :टिव्ही कलाकारउत्तर प्रदेशलग्न