Join us
Daily Top 2Weekly Top 5

रणवीर सिंगच्या 'धुरंधर २' मधून 'या' लोकप्रिय अभिनेत्रीचा पत्ता कट, स्वत:च केला खुलासा, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 12:27 IST

'धुरंधर २' मधून एक चेहरा गायब! लोकप्रिय अभिनेत्रीचा 'या' चित्रपटातून पत्ता कट,म्हणाली...

Dhurandhar 2 : आदित्य धर लिखित दिग्दर्शित 'धुरंधर' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. रणवीर सिंह आणि नवोदित अभिनेत्री सारा अर्जुनची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा  वर्षाच्या शेवटी प्रदर्शित झाला होता.मात्र, या चित्रपटाने अगदी कमी कालावधीत बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं. हा चित्रपट वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा ठरला. त्यानंतर आता इंडस्ट्रीत चर्चा आहे ती धुरंधर- द रिव्हेंज या बहुप्रतीक्षित चित्रपटाची.'धुरंधर'च्या प्रचंड यशानंतर, प्रेक्षक त्याचा दुसरा भाग पाहण्यास उत्सुक आहेत. आता १९ मार्चला 'धुरंधर २' सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. यासोबत चित्रपटात जुनेच कलाकार दिसणार की नवे चेहरे असतील. याबद्दल जाणून घेण्यास प्रचंड उत्सुकता आहे. त्यातच चित्रपटातून एका अभिनेत्रीचा पत्ता कट झाल्याची माहिती मिळते आहे. 

रणवीर सिंह, अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर. माधवन अशी तगडी स्टार असलेला धुरंधर अजूनही बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे. सारा अर्जुन आणि सौम्या टंडनने देखील चित्रपटात जबरदस्त अॅक्टिंग केली. त्याचबरोबर  धुरंधरमधील शरारत गाण्यावर थिरकून क्रिस्टल डिसूझा चार चॉंद लावले. ती ‘धुरंधर २’ मध्येही दिसेल अशी चाहत्यांना आशा होती. पण आता क्रिस्टलने स्वतःच एक मोठा खुलासा केला आहे: ती ‘धुरंधर २’ चा भाग नाही. तिला या चित्रपटातून वगळण्यात आले आहे. मात्र, फिल्मी ज्ञानला दिलेल्या या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये आपण नसल्याचा खुलासा तिने केला आहे.क्रिस्टलने यापूर्वी एका मुलाखतीत गंमतीने म्हटले होतं, "प्रतीक्षा करा." यामुळे चित्रटातील तिच्या भूमिकेबद्दल अनेक तर्कवितर्क लावण्यात आले.पण आता तिने 'धुरंधर २' मध्ये ती दिसणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, रणवीर सिंगच्या धुरंधर  सिनेमाची जितकी चर्चा झाली. तितकीच या सिनेमातील गाण्यांचीही चाहत्यांमध्ये क्रेझ पाहायला मिळाली. या सिनेमातील शरारत या गाण्याने प्रेक्षकांना अक्षरश भुरळ घातली होती.दरम्यान, शरारत गाण्यामध्ये अभिनेत्री क्रिस्टल डिसूझा आणि आयेशा खान यांच्या डान्स नंबरने सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं. 

English
हिंदी सारांश
Web Title : Krystle D'Souza out of 'Dhurandhar 2'; reveals the reason.

Web Summary : Krystle D'Souza confirms she won't be in 'Dhurandhar 2', despite expectations after her dance number in the first film. The sequel stars Ranveer Singh, and other actors. Fans loved her 'Shararat' song performance.
टॅग्स :रणवीर सिंगधुरंधर सिनेमाक्रिस्टल डिसूझाबॉलिवूडसिनेमा