Join us
Daily Top 2Weekly Top 5

'क्रिश ४'मध्ये 'या' दोन अभिनेत्री हृतिक रोशनसोबत झळकणार, प्रियंका चोप्राचा पत्ता कट होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 17:39 IST

'क्रिश ४'मध्ये प्रियंका चोप्रा दिसणार नसून तिच्या जागी बॉलिवूडमधील दोन लोकप्रिय अभिनेत्री दिसणार आहेत (krrish 4)

'क्रिश ४' (krrish 4) सिनेमाची सध्या सर्वांना उत्सुकता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून 'क्रिश ४'विषयी मोठे आणि महत्वाचे अपडेट समोर येत आहेत. 'क्रिश ४'सिनेमा हृतिक रोशनच्या (hrithik roshan) करिअरमधील महत्वाचा सिनेमा ठरणार आहेच. याशिवाय 'क्रिश ४'सिनेमा बिग बजेट म्हणून ओळखला जाणार आहे. 'क्रिश' सिनेमाच्या आधीच्या दोन भागांमध्ये दिसलेली प्रियंका चोप्रा (priyanka chopra) 'क्रिश ४'मध्ये दिसणार नाही. तिच्या जागी एक नव्हे तर दोन लोकप्रिय अभिनेत्रींची वर्णी लागली आहे. कोण आहेत या अभिनेत्री?

'क्रिश ४'मध्ये दिसणार या दोन अभिनेत्री

'क्रिश ४'विषयी एक मोठी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे 'क्रिश ४'सिनेमात एक नव्हे तर दोन लोकप्रिय अभिनेत्री झळकणार आहेत. यापैकी एक अभिनेत्री म्हणजे नोरा फतेही. तर दुसरी अभिनेत्री म्हणजे प्रिती झिंटा. टेली चक्करच्या रिपोर्टनुसार प्रिती आणि नोरा या 'क्रिश ४'मध्ये दिसणार आहेत. त्यामुळे 'क्रिश ४'मधून प्रियंका चोप्राचा पत्ता कट होणार, हे उघड झालंय. प्रियंका आता आंतरराष्ट्रीय स्टार झाल्याने ती 'क्रिश ४'मध्ये दिसण्याची शक्यता कमीच आहे. प्रिती झिंटाने 'कोई मिल गया' आणि 'क्रिश' या दोन्ही सिनेमांमध्ये काम केल्याने 'क्रिश ४'मध्ये प्रिती कोणत्या भूमिकेत दिसणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.

हृतिकच करणार 'क्रिश ४'चं दिग्दर्शन

राकेश रोशन यांनी काही महिन्यांपूर्वीच दिग्दर्शनातून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं होतं. तसंच 'क्रिश ४' मोठा सिनेमा असणार आहे आणि बजेटमुळे सिनेमाला वेळ लागत असल्याचं ते म्हणाले होते. यशराज फिल्मचे आदित्य चोप्रा सिनेमाची निर्मिती करणार आहे. २०२६ मध्ये सिनेमाच्या शूटला सुरुवात होईल. 'पिंकव्हिला'च्या रिपोर्टनुसार, हृतिक रोशन 'क्रिश ४' सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. अभिनयासोबतच तो दिग्दर्शनाची जबाबदारी उचलणार आहे.

टॅग्स :प्रियंका चोप्रानोरा फतेहीबॉलिवूडहृतिक रोशन