करण जोहर, काजोल व अजय देवगण यांच्यात पुन्हा पॅचअप झालेय. पण २०१६ मध्ये करण व काजोल यांच्यातील भांडण चांगलेच विकोपाला गेले होते. करणने काजोलसोबतच्या या भांडणासाठी तिचा पती अजय देवगण याला जबाबदार ठरवले होते. होय, करणचा ‘ऐ दिल है मुश्किल’ आणि अजयचा ‘शिवाय’ हे दोन्ही चित्रपट बॉक्सआॅफिसवर एकाचवेळी प्रदर्शित होणार होते. या रिलीजवरून करण व अजय दोघांत वाद झाला होता. बॉक्सआॅफिसवरचा संघर्ष टाळण्यासाठी दोघांनीही आपआपल्या चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यास नकार दिला होता. चित्रपटाच्या बिझनेसवरही याचा परिणाम झाला होती. अजय व करणच्या या भांडणात करण व काजोलची मैत्रीही तुटेपर्यंत ताणली गेली होती. इतकी की, आता माझ्यात व काजोलमध्ये कुठलीही मैत्री नाही, असे करणने जाहिर करून टाकले होते. आपल्या आॅटोबायोग्राफीत त्याने काजोलसोबतच्या भांडणाचा उल्लेख केला होता. पण आता सगळे मतभेद मिटले आहेत आणि करणने अगदी नॅशनल टीव्हीवर याबद्दल काजोलची माफी मागितली आहे.
करण जोहरने मागितली अजय देवगण व काजोलची माफी, वाचा बातमी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 10:02 IST
होय, ‘ कॉफी विद करण 6’ या आपल्या शोमध्ये करणने अजय व काजोलला बोलवले होते. या शोदरम्यान करणने काजोल व अजय दोघांचीही माफी मागितली.
करण जोहरने मागितली अजय देवगण व काजोलची माफी, वाचा बातमी!!
ठळक मुद्देकरण जोहर, काजोल व अजय देवगण यांच्यात पुन्हा पॅचअप झालेय. पण २०१६ मध्ये करण व काजोल यांच्यातील भांडण चांगलेच विकोपाला गेले होते.