Join us

कलाकारांनी वापरलेल्या महागड्या कपड्यांचं पुढे काय होतं माहितीये?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 17:15 IST

आजवर कलाविश्वात अनेक ऐतिहासिक, पौराणिक सिनेमांची निर्मिती झाली. सहाजिकच या सिनेमांसाठी कलाकारांना तसाच गेटअपही करावा लागला. त्यामुळे या कलाकारांनी अनेक महागडी उंची वस्त्रे परिधान केल्याचं पाहायला मिळालं

आजकाल कलाविश्वात सगळेच बिग बजेट चित्रपटांची निर्मिती करत आहेत. त्यामुळे  सिनेमाच्या सेटपासून ते कलाकारांच्या कपड्यांपर्यंत प्रत्येक गोष्टीवर पाण्यासारखा पैसा खर्च केला जातो. परंतु, सिनेमा रिलीज झाल्यानंतर या महागड्या सेट, कलाकारांनी वापरलेले कपडे वा अन्य महागड्या गोष्टींचं काय केलं जातं असा प्रश्न कायम प्रेक्षकांना पडतो. त्यामुळेच कलाकारांनी वापरलेल्या महागड्या कपड्यांचं नंतर काय केलं जातं ते जाणून घेऊयात.`

आजवर कलाविश्वात अनेक ऐतिहासिक, पौराणिक सिनेमांची निर्मिती झाली. सहाजिकच या सिनेमांसाठी कलाकारांना तसाच गेटअपही करावा लागला. त्यामुळे या कलाकारांनी अनेक महागडी उंची वस्त्रे परिधान केल्याचं पाहायला मिळालं. याचं उदाहरण द्यायचं झालं तर, पदमावतमधील दीपिका पदुकोणचा लेहंगा, रणवीर सिंगचा सुल्तान अलाउद्दीन खिलजीचा लूक किंवा उमराव जानमधील रेखाने परिधान केलेला लेहंगा या सगळ्या लूकची नेटकऱ्यांमध्ये विशेष चर्चा रंगली. परंतु, हे सिनेमा रिलीज झाल्यानंतर हे कपडे कलाकारांनी पुन्हा परिधान केले नाहीत.

काय होतं या महागड्या कपड्यांचं? 

सिनेमामध्ये कलाकारांनी एकदा वापरलेल्या कपड्यांचा लिलाव केला जातो. देवदास सिनेमात माधुरीने परिधान केलेला हिरव्या रंगाचा लेहंगा साऱ्यांनाच आठवत असेल हा लेहंगा तब्बल ४५ हजारांना विकण्यात आला. तसंच, बऱ्याचदा हे कपडे मिसमॅच करुन पुन्हा वापरले जातात. परंतु, हे असे कपडे मुख्य भूमिका साकारणाऱ्या कलाकारांना दिले जात नाहीत. तर सिनेमातील सहकलाकार, बँकग्राऊंड डान्सर यांना दिले जातात. बंटी और बबली सिनेमातील कजरारे या गाण्यातील ऐश्वर्या रायने परिधान केलेला लेहंगा, बँड बाजा बारात सिनेमातील एका गाण्यातील एका बँकग्राऊंड डान्सरला देण्यात आला होता. 

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा