Join us
Daily Top 2Weekly Top 5

जे बात! जगातल्या सगळ्यात महागड्या अभिनेत्यांमध्ये एकटा बॉलिवूड खिलाडी, इतकी केली कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2020 12:32 IST

फोर्ब्सनुसार, या यादीत असलेल्या जास्तीत जास्त अभिनेत्यांची कमाई प्रॉडक्ट एंडोर्समेंटमुळे झालेली आहे. तर एंडोर्समेंटबाबतही अक्षय कुमार मागे नाही. अक्षय

(Image Credit : filmfare.com)

फोर्ब्सची २०२० मध्ये सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांची यादी समोर  आली आह. या यादीची खास बाब म्हणजे या यादीत जागा मिळवणारा अक्षय कुमार हा एकुलता एक बॉलिवूड अभिनेता आहे. तो ४८.५ मिलियन डॉलर म्हणजेच ३६२ कोटी रूपयांच्या कमाईसोबत या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे.

फोर्ब्सनुसार, या यादीत असलेल्या जास्तीत जास्त अभिनेत्यांची कमाई प्रॉडक्ट एंडोर्समेंटमुळे झालेली आहे. तर एंडोर्समेंटबाबतही अक्षय कुमार मागे नाही. अक्षय कुमार एका वर्षात अनेक सिनेमे करण्यासाठी ओळखला जातो. सध्या त्याचे अनेक सिनेमे पाइपलाईनमध्ये आहेत. सध्या तो यूकेमध्ये त्याच्या 'बेल बॉटम' सिनेमाचं शूटींग करत आहे. तर त्याचे 'लक्ष्मी बॉम्ब', 'सूर्यवंशी', 'पृथ्वीराज', 'अतरंगी रे' हे सिनेमे रिलीज व्हायचे आहेत.

१० सर्वात जास्त कमाई करणारे अभिनेते

या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे ड्वेन जॉनसन, ज्याला आपण सगळे द रॉकच्या नावाने ओळखतो. ड्वेनने १ जून २०१९ ते जून २०२० पर्यंत ८७.५ मिलियन डॉलरची कमाई केली आहे तसेच रयान रेलॉल्ड्स हा दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने ७१.५ मिलियन डॉलरची कमाई केली आहे.

या यादीत ५८ मिलियन डॉलरच्या कमाईसोबत मार्क व्हालबर्ग तिसऱ्या क्रमांकावर, चौथ्या क्रमांकावर अभिनेता-दिग्दर्शक बेन एफ्लेक(५५ मिलियन डॉलर), पाचव्या क्रमांकावर विन डिजल(५४ मिलियन डॉलर), सहाव्या क्रमांकावर अक्षय कुमार(४८.५ मिलियन डॉलर), सातव्या क्रमांकावर मेन्युएल मिरांडा(४५.५ मिलियन डॉलर), आठव्या क्रमांकावर विल स्मिथ(४४.५ मिलिनय डॉलर), नवव्या क्रमांकावर एडम सॅंडलर(४१ मिलियन डॉलर) आणि १०व्या क्रमांकावर जॅकी चेन(४० मिलियन डॉलर) आहेत.

हे पण वाचा :

महिमा चौधरीचा सुभाष घईंवर मोठा आरोप; म्हणाली, तेव्हा केवळ चौघांनी साथ दिली...!!

कॅन्सरच्या वेदना मला ठाऊक आहेत, पण तू फायटर आहेस; युवराजचा संजय दत्तसाठी खास मेसेज

तब्बल चार वर्षे मृत्यूशी झुंज देत होती सुश्मिता सेन, तिनेच सांगितला हा धक्कादायक अनुभव

टॅग्स :अक्षय कुमारबॉलिवूडफोर्ब्सहॉलिवूड