Join us

यशने प्रभास-रजनीकांत यांना मागे टाकले; रावणाच्या भूमिकेसाठी मागितले 150 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2023 18:46 IST

नितेश तिवारींच्या 'रामायण' चित्रपटात रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश प्रमुख भूमिकेत असणार आहेत.

KGF Actor Yash: अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या मोस्ट अवेटेड 'अॅनिमल' चित्रपटामुळे चर्चेत आहे. यात त्याच्यासोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना, अनिल कपूर आणि बॉबी देओल आहे. यानंतर तो दिग्दर्शक नितेश तिवारींच्या 'रामायण' चित्रपटाचे शूटिंग सुरू करेल. या बिग बजेट चित्रपटात रावणाची भूमिका साउथ स्टार यश करणार असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नितेश तिवारीच्या आगामी रामायणमध्ये साऊथ अभिनेत्री साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत असेल. रणबीर, साई आणि यश, या तिघांना एकत्र पाहण्यासाठी चाहते आसुसले आहेत. दरम्यान, एक रिपोर्ट समोर आला आहे, ज्यामध्ये दावा करण्यात आला आहे की, यश या चित्रपटासाठी प्रभास आणि रजनीकांत यांच्याप्रमाणेच मोठी फी आकारत आहे.

रिपोर्ट्नुसार, यशने या चित्रपटासाठी 150 कोटी रुपये फी मागितली आहे. हा दावा खरा असेल, तर ते रणबीर कपूरपेक्षा कितीतरीपट जास्त फी घेत आहे. यश आगामी काळात KGF 3 मध्येही दिसणार आहे, पण रामायण चित्रपटासाठी त्याने KGF चे काम थांबवल्याची माहिती आहे. केजीएफपेक्षा रावणााचा लूक अतिशय वेगळा असेल. यासाटी त्‍याने शरीरात सुधारणा करण्‍यासाठी मेहनत घेत आहे. आता या बातम्या किती खऱ्या आहेत, हे येत्या काही महिन्यांत कळेलच.

टॅग्स :यशरणबीर कपूरसाई पल्लवीबॉलिवूडरामायण