Join us

सप्तपदी घेण्याआधीच विकी कौशल आणि कतरिना कैफ होणार पती-पत्नी?,हे आहे यामागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 12:26 IST

विकी कौशल आणि कतरिना कैफचं लग्न  ७ ते ९ डिसेंबर दरम्यान होणार आहे.

सध्या लग्नाचा सीझन सुरू झाला आहे. टीव्हीपासून बॉलीवूडपर्यंत अनेक जोडपी लग्नाच्या बेडीत अडकण्यासाठी सज्ज  आहेत. अशात विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाच्या चर्चाही जोरात सुरू आहेत. विकी आणि कतरिनाच्या लग्नाची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. दोघांच्या लग्नाबाबत काहीनाकाही माहिती सातत्याने समोर येत आहे.  रिपोर्टनुसार आता अशी बातमी आहे की, विकी आणि कतरिना आज लग्न करणार आहेत.

विकी-कतरिना आज लग्न करणार?विकी कौशल आणि कतरिना कैफचं लग्न  ७ ते ९ डिसेंबर दरम्यान होणार आहे. राजस्थानमध्ये एका खासगी समारंभात दोघांचे लग्न होणार आहे. पण ताज्या अपडेटनुसार, याआधी दोघे कोर्ट मॅरेज करणार आहेत. पिंकविलाच्या बातमीनुसार, दोघांचे लग्न स्पेशल मॅरेज अॅक्ट, 1954 अंतर्गत होणार आहे. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार,'जर दोघांचा विवाह झाला तर तो विशेष विवाह कायदा 1954 अंतर्गत होईल. कपलला तीन प्रत्यक्षदर्शींच्या सह्या घ्याव्या लागतील. त्यानंतर ते लग्न करणार आहेत. या कोर्ट मॅरेजनंतर विकी आणि कतरिना राजस्थानला रवाना होऊ शकतात. त्याच्यासोबत त्याचे मित्र आणि कुटुंबीयही असतील.

या अटी पाहुण्यांसमोर ठेवल्या जाणार विकी कौशल आणि कतरिना कैफने त्यांच्या लग्नात पाहुण्यांसाठी काही अटी ठेवल्या असल्याची माहिती आहे.  दोघेही त्यांचा खास दिवस खाजगी ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. 

*लग्नाबद्दल कोणीही बोलणार नाही.*कोणी फोटोग्राफी करणार नाही.*कोणीही सोशल मीडियावर फोटो शेअर करणार नाही*कोणीही आपले लोकेशन सोशल मीडियावर शेअर करणार नाही*वेन्यूवरुन निघण्याआधी तुम्ही बाहेरच्या जगाशी संपर्क साधणार नाही.*वेडिंग प्लानर्सच्या परवानगीनंतरच सगळे  फोटो शेअर केले जाऊ शकतात. *लग्नाच्या ठिकाणा कोणीही व्हिडिओ किंवा रील बनवू शकत नाही.

टॅग्स :कतरिना कैफविकी कौशल