Join us
Daily Top 2Weekly Top 5

आई झाल्यानंतर पहिल्यांदाच दिसली कतरिना कैफ, विकी कौशल फोटो शेअर करत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 09:47 IST

विकी कौशलने पत्नी आणि अभिनेत्री कतरिना कैफसोबतचा एक खास फोटो शेअर केला.

Katrina Kaif vicky Kaushal : बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी काल ९ डिसेंबर २०२५ रोजी त्यांच्या लग्नाचा चौथा वाढदिवस साजरा केला. विशेष म्हणजे, आई-वडील झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच वाढदिवस आहे. या खास प्रसंगी विकीने कतरिनासोबतचा एक फोटो शेअर केला आहे, जो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

लग्नाच्या चौथ्या वाढदिवशी विकीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कतरिना बरोबरचा एक सुंदर फोटो शेअर करत, त्याला एक गोड कॅप्शन दिले आहे. त्यानं लिहलं, "आज साजरा करत आहोत. खूप आनंदी आणि कृतज्ञ भावना आहे, पण पुरशी झोपही झालेली नाही. आम्हाला लग्नाच्या चौथ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा". या पोस्टवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. झोया अख्तर, नेहा धुपिया आणि चाहत्यांनी विकी आणि कतरिनाला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

कतरिनाने ७ नोव्हेंबर २०२५ रोजी मुलाला जन्म दिलाय. आई झाल्यानंतरची कतरिनाची ही पहिलीच झलक चाहत्यांना पाहायला मिळाला. फोटोमध्ये कतरिना आणि विकी कॅज्युअल कपड्यांत अतिशय आकर्षक दिसत आहेत. कतरिनाचा नो मेकअप लूक तिच्या नैसर्गिक सौंदर्याची झलक दाखवत आहे. 

पार्टीत भेट ते राजस्थानमध्ये लग्नकतरिना आणि विकीने ९ डिसेंबर २०२१ रोजी राजस्थानमधील सिक्स सेन्सेस फोर्ट बर्वारामध्ये एका खासगी समारंभात लग्न केले. त्यांच्या प्रेमाची सुरुवात २०१९ साली करण जोहरने आयोजित केलेल्या एका पार्टीत झाली असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर या जोडप्याने त्यांचे लग्न होईंपर्यंत ते एकमेकांना डेट करत असल्याच्या विषयावर नेहमी बोलणे टाळले. त्यांनी त्यांच्या लग्नाआधी पोस्ट केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टमधील साम्य शोधून चाहत्यांनी त्यांच्या डेटिंगबाबत अंदाज लावले होते, पण दोघांनीही त्यांच्या नात्यावर बोलणे टाळले होते. 

English
हिंदी सारांश
Web Title : कैटरीना कैफ मातृत्व के बाद दिखीं; विक्की ने प्यारा फोटो साझा किया

Web Summary : कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी त्यांच्या चौथ्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. विकीने कतरिनाचा बाळंतपणानंतरचा फोटो शेअर केला. त्यांनी 2021 मध्ये राजस्थानमध्ये लग्न केले, तोपर्यंत त्यांचे संबंध गुप्त ठेवले.
टॅग्स :कतरिना कैफविकी कौशल