Join us

Valentine day ला Vicky Kaushal नाही तर 'या' अभिनेत्यासोबत असणार Katrina Kaif

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 17:41 IST

लग्नानंतर या दोघांनी क्वचितच एकत्र वेळ घालवला आहे. व्हॅलेंटाइन डे (Valentines dayच्या निमित्ताने दोघांमधील हे अंतर कमी होईल, असे चाहत्यांना वाटले.

Katrina Kaif Valentine plans:कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल(Vicky Kaushal) चे लग्न झाल्यापासून हे कपल एकमेकांपासून दूर दूर झाले आहेत. कधी विकी त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असतो तर कधी कतरिना तिच्या शूटमध्ये. लग्नानंतर या दोघांनी क्वचितच एकत्र वेळ घालवला आहे. व्हॅलेंटाइन डे (Valentines dayच्या निमित्ताने हे अंतर मिटून जाईल, असे चाहत्यांना वाटले. पण घडले अगदी उलट. कारण यावेळी मिसेस कौशल लग्नानंतरचा तिचा पहिला व्हॅलेंटाईन पती विकी कौशलसोबत नाही तर मित्र सलमान खान(Salman Khan)सोबत साजरा करणार आहे. 

लवकरच कतरिना कैफसलमान खानसोबत 'टायगर 3'  (Tiger 3) मध्ये दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, या शनिवारपासून टायगर त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. 5 फेब्रुवारीपासून हा चित्रपट 'दिलवाल की दिल्ली'मध्ये शूट होणार आहे. तर तिकडे कतरिना कैफही या शूटमध्ये सलमान खानसोबत शूट करण्यासाठी दिल्लीला पोहोचणार आहे.

टायगर 3 चे शूटिंग लवकरत लवकर पूर्ण करण्‍याचा प्रयत्न चित्रपटाचे निर्माते करत आहेत. मात्र 'टायगर 3'च्या शूटिंगमुळे कतरिनाला तिचा व्हॅलेंटाईन विकिपासून दूर एकटीने सेलिब्रेट करावा लागणार अहे किंवा असे देखील होऊ शकते की विकी त्याच्या लेडी लव्हसाठी व्हॅलेंटाईन साजरा करण्यासाठी दिल्लीला जाईल.

टॅग्स :कतरिना कैफविकी कौशलसलमान खान