Join us

बाबो..! कतरिना कैफच्या बहिणीला करावा लागतोय रिक्षामधून प्रवास, व्हिडीओ पाहून चाहते हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 11:50 IST

सध्या बॉलिवूडमध्ये विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे.

सध्या बॉलिवूडमध्ये विकी कौशल  (Vicky Kaushal)  आणि कतरिना कैफ  (Katrina Kaif)  यांच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. राजस्थानमध्ये होणाऱ्या या लग्नासाठी जय्यत तयारी आणि सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. लग्नाच्या या चर्चादरम्यान कतरिनाच्या कुटुंबीय कॅमेऱ्यात कैद झालेत.कतरिनाची बहीण इसाबेलचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती एका ऑटोमध्ये बसताना दिसते आहे आणि हा व्हिडीओ पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. कतरिनाची बहीण इसाबेलचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती क्लिनिकच्या बाहेर रस्त्यावर ऑटोची वाट पाहत आहे. इसाबेल कॅज्युअल लूकमध्ये दिसतेय. 

इसाबेलचा हा व्हिडिओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. ज्याच्या बहिणीच्या शाही लग्नाची आणि भव्य व्यवस्थेची एवढी चर्चा झाली आहे, ती ऑटोमधून प्रवास करत आहे, याचे यूजर्सला आश्चर्य वाटते.

दोघांचे लग्न राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स किल्लात होणार आहे, जिथे अनेक दिग्गज तसेच पीएमओच्या काही अधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या लग्नासाठी जबरदस्त सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या लग्नासाठी खासगी सुरक्षा, बाऊन्सर, हॉटेलच्या बाजूनेही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

ड्रोनवर बंदी... चाहते विकी व कतरिनाच्या लग्नाची झलक पाहण्यास उत्सुक आहेत. पण लग्नाचा एकही फोटो व्हायरल होऊ नये, यासाठी विकी व कतरिनाने म्हणे तगडा बंदोबस्त केला आहे. अगदी निमंत्रित पाहुण्यांसाठीही वेगवेगळ्या अटी व नियम लागू करण्यात आल्या आहेत. ‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, लग्नस्थळी वा त्या परिसरात कोणताही ड्रोन घिरट्या मारताना आढळल्यास तो पाडण्याचेही आदेश आहेत. 

टॅग्स :कतरिना कैफविकी कौशलइसाबेल कैफ