Join us

रश्मिकानंतर कतरिना कैफचाही फेकफोटो व्हायरल, Tiger 3 चा टॉवेल सीन केला मॉर्फ्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 15:25 IST

एका युझरने X वर कतरिनाचा  हा आक्षेपार्ह फोटो शेअर केलाय. 

प्रगत तंत्रज्ञानाचे जसे फायदे आहेत तसेच अनेक तोटेही आहेत. सध्या चर्चेत असलेल्या AI या टेक्नॉलॉजीचा दुरुपयोग होताना दिसत आहे. याबद्दल अनेक दिग्गजांनी भीतीही व्यक्त केली आहे. याचं ताजं उदाहरण म्हणजे दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाचा  व्हायरल डीपफेक व्हिडिओ. AI च्या माध्यमातूनच हा व्हिडिओ बनवण्यात आला. रश्मिकानंतर आता कतरिना कैफचाही (Katrina Kaif) एक मॉर्फ्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

कतरिना कैफच्या आगामी 'टायगर 3' (Tiger 3) सिनेमाचा टीझर रिलीज झालाय. यामध्ये तिचा एक टॉवेल सीनही आहे. याच सीनमधला फोटो मॉर्फ्ड करण्यात आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नुकतंच कतरिनाने टायगर ३ साठी किती मेहनत घेतली याचा व्हिडिओ पोस्ट करत झलक दाखवली. दरम्यान आता या व्हायरल फोटोमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. सिनेमात कतरिनाचा मिशेल लीसोबत फाईट करतानाचा हा सीन आहे. अहमद या एका युझरने X वर कतरिनाचा  हा आक्षेपार्ह फोटो शेअर केलाय.  रश्मिकाच्या व्हिडिओनंतर अमिताभ बच्चन यांनीही सोशल मीडियावरुन आवाज उठवला होता. आता कतरिनाच्या व्हायरल फोटोमुळे चिंतेचं वातावरण आहे. अशा आक्षेपार्ह प्रकाराची दखल घेत त्वरित कायदेशीर कारवाई करावी आणि कडक नियम बनवावे अशी मागणी अनेकांनी केली आहे.

टॅग्स :कतरिना कैफव्हायरल फोटोज्सोशल मीडियारश्मिका मंदाना