Join us

कतरिना कैफने केले लग्न? ब्राईडल लूकमधील फोटो होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2020 20:00 IST

कतरिनाने गुलाबी रंगाचा लेहंगा घातला असून त्यात ती खूपच सुंदर दिसत आहे.

ठळक मुद्देहे फोटो कतरिनाच्या खऱ्या आयुष्यातील नसून तिच्या आगामी चित्रपटाच्या सेटवरचे आहेत. या फोटोत आपल्याला तिच्यासोबतच तिची स्टायलिस्ट अनायता श्रॉफ, हेअरस्टायलिस्ट इयानी, मेकअप आर्टिस्ट डेनियन हे सुद्धा दिसत आहेत.

मागील काही दिवसांपासून कतरिना कैफचे नाव विकी कौशलसोबत जोडले जात आहे. ते दोघं एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जात आहे. मात्र अद्याप त्या दोघांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. यादरम्यान कतरिना आणि विकी कौशलला नुकतेच त्यांच्या एका मित्राच्या डिनर पार्टीमध्ये एकत्र पाहण्यात आले आणि आता तर कतरिनाचे ब्राईडल लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे कतरिनाने लग्न केले का असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये कतरिनाने गुलाबी रंगाचा लेहंगा घातला असून त्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. तिने या लेहंगाला साजेशी अशी ज्वेलरी देखील घातली आहे. यामुळे तर तिच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. कतरिनाचे हे फोटो तिच्या फॅन पेजकडूनच शेअर केले गेले असे नाहीये तर कतरिनाने स्वतः देखील ब्राईडल लूकमधील तिचे फोटो इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर केले आहेत. हे फोटो कतरिनाच्या खऱ्या आयुष्यातील नसून तिच्या आगामी चित्रपटाच्या सेटवरचे आहेत. या फोटोत आपल्याला तिच्यासोबतच तिची स्टायलिस्ट अनायता श्रॉफ, हेअरस्टायलिस्ट इयानी, मेकअप आर्टिस्ट डेनियन हे सुद्धा दिसत आहेत. या फोटोत हे सगळे अतिशय मस्त मुडमध्ये असून पत्ते खेळताना दिसत आहेत. 

कतरिनाने शेअर केलेल्या या फोटोला २४ तासांच्या आत 12 लाखाहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. तसेच कतरिनाच्या फॅन्सनी या फोटोवर कमेंटचा वर्षाव केला आहे. 

टॅग्स :कतरिना कैफविकी कौशल