Join us

.....म्हणून कतरिना कैफनं विकी कौशलसोबतचं नातं लपवून ठेवलं होतं?, आता कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 19:08 IST

Katrina Kaif and Vicky Kaushal Wedding :कतरिना कैफ विकीला दोन वर्षे डेट केले. या नात्याचे रुपांतर आता लग्नात होणार आहे.

असं म्हणतात लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात. कतरिना कैफ ९ डिसेंबरला (आज) उरी फेम अभिनेता विकी कौशलची पत्नी होणार आहे. कतरिना कैफ विकीला दोन वर्षे डेट केले. या नात्याचे रुपांतर आता लग्नात होणार आहे.  मात्र आतापर्यंत कतरिना कैफने तिच्या लग्नाची अधिकृत घोषणा केलेली नाही. यामागे काय कारण असू शकते. याबाबत आजपर्यंत कोणालाच माहिती मिळालेली नाही. पण आता कतरिनाच्या एका जुन्या मुलाखतीवरून त्यांचे नाते आणि लग्न गुपित का ठेवले याचा अंदाज येऊ शकतो.

कतरिनाचे नाते अधिकृत न करण्याचे कारण काय? कतरिना कैफने तिच्या एका जुन्या व्हिडिओमध्ये लग्न आणि नातेसंबंधाबाबत तिचे विचार सांगितले होते. . कतरिना डीएनएशी बोलताना सांगितले, ही मी होते का, जिने म्हटले होते की मी लग्न होईपर्यंत अविवाहित राहणार आहे (हसते). म्हणूनच आपण नेहमी आपल्या विधानांवर ठाम राहिले पाहिजे. तेव्हापासून टेक्निकली माझं स्टेट्स अविवाहित आहे. माझ्या मते मी अजूनही अविवाहित आहे.

मुलाखतीत अभिनेत्रीने सांगितले होते की, देवाची इच्छा असेल तेव्हा लग्न होईल. प्रेमात पडणं आणि लग्न करणं हा सगळा नशिबाचा खेळ आहे. कतरिना म्हणाली होती- मला वाटते की अशा गोष्टी नशिबावर सोडल्या पाहिजेत. अखेर कतरिना बॉयफ्रेंड विकी कौशलसोबत लगीनगाठ बांधणार आहे. कतरिना कैफचे विकी कौशलच्या आधी रणबीर कपूर, सलमान खानसोबत रिलेशनशीपमध्ये होती. 

सूत्रांच्या माहितीनुसार, विकी आणि कतरिना हिंदू व ख्रिश्चन या दोन्ही धर्म पद्धतीनुसार लग्न करणार आहेत.प्रथम या दोघांचा हिंदू पद्धतीने लग्नसोहळा होईल व त्यानंतर ख्रिश्चन पद्धतीनेदेखील ते लग्नगाठ बांधणार आहेत.

टॅग्स :कतरिना कैफविकी कौशल