Join us

VIDEO : कतरिना कैफ आणि हृतिक रोशनच्या 'बॅंग बॅंग' गाण्याचा मेकिंग व्हिडीओ व्हायरल, बघा कसे करत होते प्रॅक्टिस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2020 16:20 IST

कतरिना कैफ आणि हृतिक रोशनचा हा व्हिडीओ त्याच्या फॅन क्लबने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

कतरिना कैफ आणि हृतिक रोशनच्या 'बॅंग बॅंग' सिनेमातील टायटल सॉंग चांगलंच गाजलं होतं. आता सध्या बॅंग बॅंग गाण्याचा मेकिंग व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत कतरिना कैफ आणि हृतिक रोशन डान्स प्रॅक्टिस करताना दिसत आहेत. व्हिडीओत बघू शकता की, हृतिका रोशन डान्स करता करता स्टेप विसरतो, त्यानंतर पुन्हा शूट करतो.

कतरिना कैफ आणि हृतिक रोशनचा हा व्हिडीओ त्याच्या फॅन क्लबने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. दोघांच्या या व्हिडीओला एक लाख ४४ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. कतरिना आणि हृतिकच्या या व्हिडीओवर लोक भरभरून कमेंट करत आहेत आणि आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

कतरिना कैफच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर ती लवकरच 'सूर्यवंशी' सिनेमात दिसणार आहे. ती या सिनेमात अक्षय कुमारसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेता हृतिक रोशन सध्या त्याच्या आगामी 'क्रिश ४' च्या शूटींगमध्ये बिझी आहे. या सिनेमात हृतिकसोबतच अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीही महत्वाच्या भूमिकेत आहे.

कतरिना आणि हृतिकची जोडी बॉलिवूडमधील सर्वात फेमस जोड्यांपैकी आहे. दोघांना एकत्र बघण्यासाठी त्यांचे फॅन्स उत्सुक असतात. आता पुन्हा ते एकत्र कधी बघायला मिळतील या प्रतिक्षेत त्यांचे फॅन्स आहेत. 

टॅग्स :कतरिना कैफहृतिक रोशनबॉलिवूडसोशल व्हायरल